Taapsee pannu to play mithali raj in sports biopic shabaash mithu | धाकड गर्ल मिताली राजची भूमिका साकारणार बॉलिवूडची ही अभिनेत्री
धाकड गर्ल मिताली राजची भूमिका साकारणार बॉलिवूडची ही अभिनेत्री

सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे आणि या बायोपिकना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळतेय. आता या लिस्टमध्ये आणखी एक भर पडली आहे. क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ नाही, हे ठणकावून सांगणारी धाकड गर्ल,  जिचा खेळ पाहून केवळ मुलीच नव्हे तर मुलांनाही महिला क्रिकेटपटूंचा आदर करावासा वाटला तिचं नाव आहे मिताली राज. मितालीच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येतोय. यात मितालीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे. तापसी सध्या करिअरच्या शिखरावर आहे. एकापेक्षा एक हिट सिनेमा तापसी बॉलिवूडला देते आहे.
फिल्म ट्रेंड एनालिस्ट तरण आदर्श ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती कन्फर्म केली आहे.  या सिनेमाचे नाव शाबाश मिठू असे आहे. राहुल ढोलकिया या सिनेमाचे दिग्दर्शन करतो आहे. या बातमी शेअर करताना त्यांनी मितालीचा तापसी आणि दिग्दर्शक राहुल ढोलकियांचा फोटो शेअर केला आहे. 


मितालीचा आज वाढदिवस आहे. तापसीनेही मितालीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत मिताली केप कपताना दिसतेय. या फोटोला कप्शन देताना तापसीने लिहिले आहे, ''तुम्ही आम्हाला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत. माझे हे भाग्य आहे की तुमची भूमिका मला पडद्यावर साकारायला मिळते आहे.'  


 वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर तापसी लवकरच थापडमध्ये दिसणार आहे. तसेच तापसी एथलिट रश्मिची भूमिका देखील साकारणार आहे. आता तापसी मितालीची भूमिका रुपेरी पडद्यावर कशी साकारतेय याची उत्सुकता दोघींच्या फॅन्सना आहे. 

Read in English

Web Title: Taapsee pannu to play mithali raj in sports biopic shabaash mithu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.