अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच तिचा थप्पड सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. लवकरच तापसी शाबास मिथू या सिनेमात दिसणार आहे, हा सिनेमा महिला क्रिकेटर मिताली राज हिच्या आयुष्यावर आधारित आहे.  यात मितालीची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नू साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले. तापसी सध्या करिअरच्या शिखरावर आहे. एकापेक्षा एक हिट सिनेमा तापसी बॉलिवूडला देते आहे. 


तापसी मुळची दिल्लीची आहे कामासाठी ती मुंबईत आली. तापसीने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला होता की तिला मराठी जेवणं फार आवडते. ऐवढचं नाही तर भाकरी तापसी ताव मारते.  तिला मराठी भाषा शिकायला आवडेल असे ही तिने सांगितले होते. 


तापसी पन्नूने २०१० साली तेलुगू सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तापसीने तमिळ व मल्याळी सिनेमांमध्ये काम केले आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या 'चष्मे बद्दूर' या सिनेमातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१६ साली प्रदर्शित झालेल्या 'पिंक' सिनेमामधून. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज तापसी बी-टाऊनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. परखड बोलणारी अभिनेत्री अशीही तिची ओळख आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taapsee pannu like it eat maharashtrian dish bhakri gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.