taapsee pannu grandmother passes away-ram |  तापसी पन्नूच्या आयुष्यातील या खास व्यक्तिने घेतला जगाचा निरोप, शेअर केली भावूक पोस्ट

 तापसी पन्नूच्या आयुष्यातील या खास व्यक्तिने घेतला जगाचा निरोप, शेअर केली भावूक पोस्ट

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच तापसी तिच्या पर्सनल लाइफबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मुंबईत अडकून पडली असताना याचदरम्यान तापसीच्या कुटुंबातील एका व्यक्तीने  जगाचा निरोप घेतला. ती म्हणजे तापसीची आजी.
स्वत: तापसीने सोशल मीडियावर याची माहिती दिली. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तापसीने आपले दु:ख व्यक्त केले. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिचे सांत्वन केले.
तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात गुरुद्वारामध्ये पूजा स्थळाच्या जवळ तापसीच्या आजीचा फोटो ठेवण्यात आला आहे. हा फोटो शेअर करताना तापसीने आजीच्या निधनाची बातमी दिली. 

‘आज आजीने जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने आमच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. आजी तू नेहमीच आमच्या हृदयात राहशील,’ असे तिने लिहिले. तापसीच्या या इमोशनल पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आहे.
आजीच्या निधनानंतर तापसी तिच्या अंत्यदर्शनालाही जाऊ शकली नाही. तापसी लॉकडाऊनमुळे सध्या मुंबईमध्येच अडकली आहे. ती या ठिकाणी तिच्या बहिणीसोबत राहत आहे. तापसीचे तिच्या आजीशी खूप खास बॉन्डिंग होते. त्यामुळे आजीच्या जाण्याने तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

यापूर्वी तापसीने ‘गेम ओवर’ या तिच्या सिनेमाबद्दलची पोस्ट शेअर केली होती. या चित्रपटाने माझे आयुष्य आणि करिअरला एक वेगळे वळण दिले, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते. ‘आपण सगळे दोन आयुष्य जगतो. पहिले आयुष्य मागे सोडले की, दुस-या आयुष्याची सुरुवात होते. गेम ओवर हा सिनेमा माझ्यासाठी एका कहाणीपेक्षा खूप काही होता,’ असेही तिने म्हटले होते.
काही दिवसांपूर्वीच तापसी तिच्या पर्सनल लाइफबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.  पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. मला कोणतीच गोष्ट लपवायची नाही. माझ्या लाइफमध्ये कोणतरी खास व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची तिला खूप अभिमान वाटतो, असे तिने सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: taapsee pannu grandmother passes away-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.