Taapsee pannu and bhumi pednekar starrer saand ki aankh teaser release tomorrow | तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर म्हणतायेत, दादीयों का स्वागत नही करोगे ?, वाचा काय आहे ही भानगड
तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर म्हणतायेत, दादीयों का स्वागत नही करोगे ?, वाचा काय आहे ही भानगड

गेल्या काही दिवसांपासून तापसी आणि भूमी यांचा 'सांड की आंख' सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमाचा टीझर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर या सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझरमध्ये आधीच तापसीने तिच्या सोशल मीडियावर एक छोट्यासा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दोघी उभ्या दिसतायेत. काही दिवसांपूर्वी दोघींच शूटिंग दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.    


'सांड की आँख' जगातील वयस्कर शार्पशूटर असलेल्या चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या महिलांच्या आयुष्यावर आधारित आहे. या दोघींची भूमिका तापसी आणि भूमी साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत. 


या चित्रपटाची निर्मिती निधी परमार व अनुराग कश्यप करत आहेत. तर दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करत आहेत. तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.  तापसी व भूमी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे एका वेगळ्या भूमिकेत त्यांना रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.


Web Title: Taapsee pannu and bhumi pednekar starrer saand ki aankh teaser release tomorrow
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.