Sushant's 'that' of Rs 15 crore will be revealed soon, important threads in the hands of CBI | सुशांतच्या 'त्या' १५ कोटी रुपयांचा लवकरच होणार उलगडा, CBIच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे

सुशांतच्या 'त्या' १५ कोटी रुपयांचा लवकरच होणार उलगडा, CBIच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर १५ कोटी रुपये बळकावल्याचा आरोप केला होता. मात्र रियाच्या बँक खात्यात असा कोणताही व्यवहार सापडला नाही. त्यामुळे एवढी मोठी रक्कम कुठे गेली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यासंदर्भात सीबीआयला धागेदोरे सापडले आहेत.


न्यूज १८ लोकमतच्या रिपोर्टनुसार, सुशांतच्या कुटुंबाने सुशांतच्या ज्या १५ कोटी रुपयांबाबत तक्रार केली, ते पैसे सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीच्या वडिलांच्या कंपनीत गुंतवले असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. श्रुतीच्या वडीलांची गारमेंटची मोठी कंपनी आहे. याप्रकरणी आता लवकरच तपास होणार आहे.

रिया-श्रुती मोदी लहानपणीच्या मैत्रीणी

दरम्यान रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदी एकमेकींना आधीपासूनच ओळखत होत्या, अशी माहितीदेखील समोर आली आहे. श्रुती ही रियाची लहानपणीची मैत्रीण आहे आणि सुशांतवर दबाव टाकून रियाने तिला सुशांतची मॅनेजर बनवले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रुती मोदीला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते.  सूत्रांच्या माहितीनुसार, आपण रियाला आधीपासून ओळखत असल्याचे श्रुतीने एनसीबीला सांगितले आहे. रिया आणि श्रुती लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. रियानेच श्रुती आणि सुशांतची भेट घडवून दिली आणि तिला मॅनेजर बनवले. सुशांत श्रुतीला आपला मॅनेजर बनवण्यासाठी तयार नव्हता. मात्र रियाने त्याच्यावर दबाव टाकला आणि श्रुतीला त्याचा मॅनेजर बनवले.

Sushant Singh Rajput Case : एनसीबीच्या तपासाला ब्रेक; पथकातील अधिकारी कोरोनाबाधित

श्रुतीला माहित होतं रिया व शोविकच्या ड्रग्स व्यवहाराबाबत

श्रुतीला रिया आणि शोविकच्या ड्रग्ज व्यवहाराबाबत पूर्णपणे माहिती होती. ती या प्रकरणात पूर्णपणे सहभागी होती. सुशांतच्या इथे नोकरी सोडल्यानंतरदेखील श्रुती रिया आणि ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती. सीबीआयने श्रुतीचा फोन जप्त केला आहे, त्यामध्ये देखील ड्रग्ज पेडलरसह तिचे चॅट्स सापडले आहेत.


श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगी यांनी सांगितले की, रिया आणि श्रुती या दोघींची ओळख कोलकात्यात झाली. पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर श्रुतीने सुशांतच्या इथली मॅनेजरची नोकरी सोडली. ड्रग्ज कनेक्शनबाबत मला काही माहिती नाही. याबाबत एनसीबी तपास सुरू आहे. हे प्रकरण कोर्टात येत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नाही. न्यायालयात प्रकरण आल्यानंतर आम्ही सर्व पुरावे कोर्टासमोर ठेवू"

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant's 'that' of Rs 15 crore will be revealed soon, important threads in the hands of CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.