sushant singh rajput cook neeraj reveals that miranda showik dipesh gave drugs to ssr | ‘सुशांतसाठी शौविक, मिरांडा आणायचे गांजा’ ; कूक नीरजचा दावा

‘सुशांतसाठी शौविक, मिरांडा आणायचे गांजा’ ; कूक नीरजचा दावा

ठळक मुद्देसुशांतचा मृतदेह 14 जूनला आढळला. त्याआधी 13 जूनच्या रात्री त्याच्याघरी पार्टी झाली होती, असा दावा काही रिपोर्टमध्ये केला गेला होता.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आला आणि पाठोपाठ बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनही समोर आले. या सगळ्यांत सुशांत प्रकरण काहीसे थंड पडले. पण आता  चाहते आणि  कुटुंबीय पुन्हा एकदा सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी सक्रीय झाल्याचे दिसतेय. तूर्तास सुशांत केसमधील महत्त्वाचा साक्षीदार मानला जाणारा त्याचा कुक नीरज याने काही खुलासे केले आहेत. नीरज अनेक दिवसांपासून गायब आहे. तो फरार असल्याचा दावाही केला जात आहे. पण आता नीरजने मीडियापुढे येत तो  दिल्लीतील आपल्या घरी असल्याचे म्हटले आहे.
टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत नीरजने सुशांत प्रकरणी अनेक खुलासे केलेत. सुशांत विशिष्ट प्रकारचे ड्रग्ज घ्यायचा का, हे मला ठाऊक नाही. पण तो गांजा घ्यायचा. सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक त्याला गांजा आणून द्यायचे, असा खुलासा नीरजने केला.  

सकाळी 8 वाजल्यानंतर सरांना पाहिलेच नाही...
घटनेच्या दिवशी नीरज सुशांतच्या घरी होता. या घटनेबद्दल त्याने सांगितले की, मी सकाळी सरांना पाणी दिले होते. यानंतर केशवने त्यांना ज्यूस दिला होता. सकाळी 8 वाजताच्यादरम्यान मी सुशांत सरांना शेवटचा भेटलो होतो. त्यानंतर सर त्यांच्या खोलीत गेले आणि बाहेर पडलेच नाहीत, असे नीरजने सांगितले.

8 तारखेला सुशांत सर टेन्शनमध्ये होते
रिया घर सोडून गेल्यानंतर सुशांत टेन्शनमध्ये होता का? असे विचारले असता, सर इतकेही टेन्शनमध्ये नव्हते. मात्र 8 तारखेनंतर ते थोडे टेन्शनमध्ये होते. (8-9 तारखेलाच सुशांतच एक्स- मॅनेजर दिशा सालियन हिने कथितरित्या आत्महत्या केली होती.) सुशांत सर काही दिवसांपासून आजारी होते. ते कधीच त्यांच्या खासगी गोष्टी स्टाफसोबत शेअर करत नव्हते, असेही नीरजने सांगितले.

सर, गांजा घ्यायचे...
सुशांत  ड्रग्ज घ्यायचा का? याबद्दल विचारले असता, मला याबद्दल माहिती नाही. पण सुशांत सर गांजा घ्यायचे. त्यांच्यासाठी सॅम्युअल मिरांडा आणि शौविक गांजा आणत असत, असा खुलासाही नीरजने केला.

13 तारखेला कोणतीही पार्टी झाली नव्हती...
सुशांतचा मृतदेह 14 जूनला आढळला. त्याआधी 13 जूनच्या रात्री त्याच्याघरी पार्टी झाली होती, असा दावा काही रिपोर्टमध्ये केला गेला होता. 13 तारखेला रिया सुशांतला भेटायला आली होती, असाही दावा केला गेला होता. नीरजने मात्र हे दावे फेटाळून लावले. 13 तारखेला ना पार्टी झाली होती, ना सरांना कोणी भेटायला आले होते, असे त्याने स्पष्ट केले.

सारा अली खानच्या अडचणीत वाढ; जुन्या फोनमध्ये रियासोबतचे सापडले ड्रग्स चॅट, NCB च्या सूत्रांचा खुलासा 

‘13 तारखेला सुशांतच्या घरी गेली होती रिया..’; भाजपा नेता म्हणाला, माझ्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput cook neeraj reveals that miranda showik dipesh gave drugs to ssr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.