bjp leader vivekanand gupta claims sushant singh rajput and Rhea Chakraborty met on 13-june | ‘13 तारखेला सुशांतच्या घरी गेली होती रिया..’; भाजपा नेता म्हणाला, माझ्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार 

‘13 तारखेला सुशांतच्या घरी गेली होती रिया..’; भाजपा नेता म्हणाला, माझ्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार 

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआय करते आहे. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या की हत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. आता याप्रकरणी पुन्हा एक धक्कादायक दावा केला जात आहे. सुशांत 14 जूनला गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. त्याआधी 13 जूनला रिया व सुशांत भेटले होते. इतकेच नाही तर सुशांतनेच रियाला तिच्या घरी सोडले होते, असा दावा भाजपा नेते विवेकानंद गुप्ता यांनी केला आहे. 8 जूननंतर मी कधीच सुशांतला भेटले नाही, असा दावा रियाने याआधी केला होता.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई भाजपाचे सेक्रेटरी विवेकानंद गुप्ता यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. 8 जूननंतर सुशांतला भेटलीच नाही, असे रिया म्हणते. पण 13 तारखेला रिया व सुशांत सोबत होते. त्यादिवशी रिया सुशांतला भेटायला त्याच्या घरी गेली होती. यानंतर रियाला सुशांतने तिच्या घरी सोडले होते. 13 जूनला रिया व सुशांत सोबत होते, असे गुप्ता यांनी सांगितले.

माझ्याकडे साक्षीदार, सीबीआयला सांगणार नाव
13 जूनला रात्री 2 ते 3 च्या दरम्यान सुशांतने रियाला तिच्या घरी सोडले होते.  
माझ्याकडे एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. मी त्याचे नाव फक्त सीबीआयला सांगेन. मी सीबीआयला जबाब देण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

सुशांतची बहीण म्हणाली, गेम चेंजर

सुशांतची बहीण श्वेता किर्तीने विवेकानंद गुप्ता यांच्या या दाव्यानंतर एक पोस्ट केली आहे. तिने लिहिले, ही ब्रेकिंग न्यूज ख-या अर्थाने गेम चेंजर आहे. एका प्रत्यक्षदर्शीनुसार, माझा भाऊ 13 तारखेच्या रात्री रियाला भेटला होता. 13 च्या त्या रात्री असे काय झाले की दुस-या दिवशी सकाळी माझा भाऊ मृतावस्थेत सापडला?

Sushant Singh Rajput Case: सुशांत प्रकरणात सीबीआयनं काय दिवे लावले ते पाहिले; शरद पवारांचा टोला

काय झालंय तुला? सुशांतचा ‘तो’ व्हिडीओ पाहून युजरवर भडकली अंकिता लोखंडे

CBIने केले मोठे वक्तव्य, म्हणाले- आम्ही कोणतीच...

 सुशांत  मृत्युप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआय करते आहे. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू आत्महत्या की हत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही. सीबीआयची टीम या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातत्याने तपास करत आहे. सीबीआयने म्हटले की, आतापर्यंत कोणतीही शक्यता या प्रकरणातील आम्ही नाकारलेली नाही.  सुशांतच्या मृत्यूशी संबंधीत सर्व बाबी लक्षात घेता सीबीआय तपास करीत आहे.  सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाची चौकशी केली जाणार आहे. सुशांतची बहीण प्रियंका आणि मीतूची चौकशी होणार आहे. याआधी ही प्रियंका आणि मीतूची चौकशी करण्यात आली होती. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील डॉक्टर तरुण यांची देखील चौकशी होणार आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp leader vivekanand gupta claims sushant singh rajput and Rhea Chakraborty met on 13-june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.