सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास दोन महिन्यांहून जास्त काळ लोटला आहे. तरीदेखील अद्याप त्याच्या आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय, एनसीबी आणि ईडी अशा तीन एजेंसी करत आहेत. या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविकला अटक करण्यात आली आहे. सध्या ते भायखळा तुरूंगात कैद आहेत. तसेच ड्रग्समध्ये बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटींची नावे समोर आली. त्यातील काहींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशी केली. यात अभिनेत्री सारा आली खानचीदेखील चौकशी करण्यात आली. दरम्यान आता अशी माहिती मिळते आहे की, एनसीबी सारा अली खानचा आधीचा फोन रिकव्हर करण्यासाठी उत्सुक आहेत. ज्यात त्यांना रिया चक्रवर्तीसोबत ड्रग्स चॅट हाती लागले आहे अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.

सीएनएन न्यूज वाहिनीच्या रिपोर्टनुसार, एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबी सारा अली खानचा जुना फोन रिकव्हर करण्यासाठी उत्सुक आहेत. हा फोन ती 2018 पर्यंत वापरत होती. साराच्या जुन्या फोनमध्ये रियासोबत ड्रग्स चॅट असल्याचा एनसीबीच्या सूत्रांनी खुलासा केला आहे. त्यामुळे सारा अली खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

साराने दिली होती सुशांतसोबतच्या रिलेशनशिपची माहिती 
एनसीबीच्या चौकशी दरम्यान सारा अली खान म्हणाली तिने कधीच ड्रग्स घेतले नाहीत. सारा अली खानने सुशांतसोबत 'केदारनाथ' सिनेमात काम केलं होतं. तिची ५ तास चौकशी करण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साराने यावेळी सुशांत आणि तिच्या रिलेशनशिपबाबत सांगितलं. साराने हेही सांगितले की, सुशांत ड्रग्स घेत होता. तसेच सुशांत रिलेशनशिपमध्ये लॉयल नव्हता असंही साराने सांगितल्याची माहिती आहे. 

ड्रग्स प्रकरणात आपल्या मुलीला सैफला मदत करायची इच्छा नाही? 
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सारा अली खान सध्या चारही बाजूने या प्रकरणात अडकली आहे मात्र यातून बाहेर पडण्यासाठी ती सैफवर अजिबात अवलंबून राहिलेली नाही. रिपोर्टनुसार सैफ आली खान या प्रकरणात सारा अली खानची कोणतीच मदत करत नाहीय. 

सैफने अमृता सिंगलाही फटकारले 
रिपोर्टनुसार सैफने पूर्वपत्नी अमृता सिंगला सुद्धा चांगलेच फटकारले आहे, जी मुलीच्या करिअ संबंधित जवळजवळ सर्व निर्णय घेते. सैफ अली खान पत्नी करिना कपूरसोबत दिल्लीत रवाना झाला आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Increase in difficulty of Sara Ali Khan; Drugs chat with Riya found in old phone, NCB sources reveal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.