Surveen Chawla Welcomes Baby Girl With Husband Akshay Thakker, Posts First Photo of Their Newborn | सुरवीन चावलाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव
सुरवीन चावलाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला आणि  कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. कारण सुरवीनच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ही आनंदाची बातमी खुद्द सुरवीननेच सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केली आहे. यानंतर मित्र, नातेवाईक आणि फॅन्सकडून  अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. त्यांच्या घरात आलेल्या या नवीन पाहुण्याच्या आगमनामुळे सुरवीन आणि पती अक्षय ठक्कर दोघे चांगलेश खुश आहेत. दोघांनी शुभेच्छा देणारे आपले हितचिंतक, मित्र आणि फॅन्सचे आभार मानलेत.तसेच सुरवीनने आपल्या लेकीचे नाव इवा असे ठेवले आहे. लेकीचा पहिला फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सुरवीन चावलाने तिचा प्रेग्नेसी टाइम मस्त एन्जॉय केला. ती कामापासून दूर असली तरीदेखील इंस्टाग्रामवर ती आपले फोटो शेअर करताना दिसली. बेबी शॉवरचेही खास फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले होते. या कार्यक्रमात ती वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळाली होती. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तिने रॉ मॅगोची पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यात पिंक रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला होता. त्यावर ज्वेलरीदेखील घातली होती. या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती.

 सुरवीनने 2015 साली अक्षय ठक्करसोबत विवाह केला. मात्र ही गोष्ट तिने बराच काळ गुलदस्त्यात ठेवली होती. त्यानंतर 2017 साली तिने इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचा फोटो शेअर करून हे वृत्त सांगितले होते. सुरवीनने छोट्या पडद्यावरून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले. मालिकेत काम केल्यानंतर हेट स्टोरी 2 व पार्च्ड या चित्रपटात तिने काम केले.


Web Title: Surveen Chawla Welcomes Baby Girl With Husband Akshay Thakker, Posts First Photo of Their Newborn
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.