पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते.  तिच्या सिनेमांची आणि प्रोजेक्टची जेवढी चर्चा होते तेवढीच  तिच्या खासगी आयुष्याविषयी होते. याचमुळे गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणा-या अभिनेत्रींमध्ये सनीचे नाव आहे

सनी सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व तिचे अपडेट देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर एक अनोखा फोटो शेअर केला आहे. त्यात मरमेड अंदाजात दिसते आहे. हा फोटो शेअर करून तिनं लिहिलं की, मला मरमेड होणं आवडतं. 

सनी लियोनीला तीन मुलं आहेत. २०१७ साली सनीने मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं नाव निशा आहे. २०१८ साली सरोगसीच्या माध्यमातून सनीनं दोन मुलांची आई बनली. या मुलांची नाव अशर व नोआ सिंग वेबर अशी आहेत.

सनी लियोनी आपल्या मुलांसोबत वेळ व्यतित करत असते. त्यांना ती बिझी शेड्युलमधून वेळ देते. सनीचे तिच्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा पहायला मिळतात. सनीचे दोन्ही मुलं खूप क्युट आहेत. 


सनी लिओनी लवकरच ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटात एक आयटम सॉन्ग करताना दिसणार आहे. याशिवाय एका मल्याळम चित्रपटातही ती झळकणार आहे.

‘रंगीला’ या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. ‘कोका कोला’नामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे.


Web Title: Sunny Leoni's Mermaid look photo on instagram
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.