Sunny Kaushal is all set to play two characters in Bhangra Paa Le | विकी कौशलप्रमाणे त्याचा भाऊ सनीदेखील आहे हॅण्डसम, या चित्रपटात दिसणार दुहेरी भूमिकेत
विकी कौशलप्रमाणे त्याचा भाऊ सनीदेखील आहे हॅण्डसम, या चित्रपटात दिसणार दुहेरी भूमिकेत


बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्याच्याप्रमाणे त्याचा भाऊ सनी कौशलदेखील बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. तो अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटात झळकला होता. त्यानंतर आता तो 'भंगडा पा ले' सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असून तो डबल रोलमध्ये दिसणार आहे. 'भंगडा पा ले' हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'भंगडा पा ले' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि ट्रेलरनंतर या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

या चित्रपटात सनीसोबत अभिनेत्री रूक्सार ढिल्लोन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन स्नेहा तौरानीने केले आहे. या चित्रपटामध्ये सनी जग्गी आणि कप्तान या दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. यात तो वडील (कप्तान) आणि मुलगा (जग्गी) या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये वडील आणि मुलगा यांच्यातील वैचारिक मतभेदांवरुन उडणारे खटके पाहायला मिळणार आहेत.


या भूमिकेबाबत सनी म्हणाला की, ‘जग्गी आणि कप्तान या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत. एकाच दिवशी या दोन्ही भूमिकांसाठीचं चित्रीकरण करणं माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होतं. मात्र हा अनुभवही छान होता. यातून मला खूप काही शिकायला मिळालं.

या चित्रपटामध्ये मी साकारत असलेल्या दोन्ही व्यक्तिरेखा या परस्पर भिन्न आहेत. त्याची विचारशैली वेगळी आहे. जग्गी एक स्वातंत्रसेनानी आहे तर कप्तानचे विचार मात्र सनीपेक्षा वेगळे आहेत. 


Web Title: Sunny Kaushal is all set to play two characters in Bhangra Paa Le
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.