ठळक मुद्देसनीने अद्याप या चित्रपटाची कास्ट व टायटल फायनल केलेले नाही. 

सनी देओलचा मुलगा करण देओलचा अगदी ग्रॅण्ड डेब्यू झाला. सनीने अगदी दणक्यात ‘पल पल दिल के पास’  या चित्रपटातून आपल्या मुलाला लॉन्च केले. सनीच्या लेकाचा चित्रपट म्हणून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा होती. पण ‘पल पल दिल के पास’ रिलीज झाला आणि प्रेक्षकांची निराशा झाली. होय, बॉक्स आॅफिसवर हा सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. पण हो, या चित्रपटातील करणच्या अभिनयाचे मात्र कौतुक झाल्याशिवाय राहिले नाही. आता याच करणला दुसरा चित्रपट मिळाला आहे.

होय, चर्चा खरी मानाल तर करण आता एका तेलगू सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. करणचा हा दुसरा सिनेमाही त्याचे पापा सनी देओल हेच प्रोड्यूस करणार आहेत. हा सिनेमा ‘ब्रोचेवरेवरूआ’ या तेलगू चित्रपटाचा रिमेके असेल.

 सनीने या सिनेमाचे हक्क विकत घेतले आहे. सध्या कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व सिनेमाचे शूटींग ठप्प आहे. त्यामुळे परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर सनी या चित्रपटाची घोषणा करणे अपेक्षित आहे.
‘ब्रोचेवरेवरूआ’ हा तेलगू सिनेमा गतवर्षी प्रदर्शित झाला होता आणि सुपरडुपर हिट झाला होता. या क्राइम कॉमेडी व थ्रीलर सिनेमात श्री विष्णु, निवेता थॉमस, सत्यदेव कंचरण आदींनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. अभ्यासात जराही इंटरेस्ट नसलेल्या तीन मित्रांची ही कथा आहे. एकेदिवशी या तीन मित्रांच्या ग्रूपमध्ये एका मुलीची एन्ट्री होते आणि यानंतर तिघांचेही अख्खे आयुष्य बदलते, असे या सिनेमाचे ढोबळ कथानक आहे.

सनीने अद्याप या चित्रपटाची कास्ट व टायटल फायनल केलेले नाही. तूर्तास याच्या स्क्रिप्टवर काम सुरु आहे. साहजिकच या दुस-या सिनेमामुळे करण उत्साहित आहे. आता केवळ हा दुसरा सिनेमा करणच्या करिअरला कसे वळण देतो, तेच बघायचेय. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sunny deol son karan deol to work in hindi remake of telugu hit brochevarevarura-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.