ठळक मुद्देबेताब या चित्रपटाद्वारे सनी देओलने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीचा म्हणजेच १९८४ चा हा किस्सा आहे.

सनी देओलने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून त्याला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. सनी एक प्रसिद्ध अभिनेता असला तरी मीडियापासून दूर राहाणेच तो पसंत करतो. काही महिन्यांपूर्वी सनीने बिग बॉस या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्या आयुष्यातील एक किस्सा या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक सलमान खानने सांगितला होता. तो किस्सा ऐकून उपस्थितांना आपले हसू आवरले नाही. 

सनीने चक्क पेट्रोल पंपावर रागाच्या भरात काही लोकांना मारायला चप्पल उचलली होती. बेताब या चित्रपटाद्वारे सनी देओलने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीचा म्हणजेच १९८४ चा हा किस्सा आहे. सनी देओल पेट्रोल पंपावर उभा असताना सात-आठ मुलं त्याच्या अवतीभवती जमा झाले आणि त्याला चिडवू लागले. सनी देओलने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्या मुलांनी सनी देओलचे ऐकलं नाही. ते सनीला चिडवतच होते. सनीला  प्रचंड राग आला आणि त्याने रागाच्या भरात त्यांना मारण्यासाठी चप्पल उचलली. सनीचा राग पाहून ती मुलं इतकी घाबरली की, त्यांनी तिथून पळ काढला. 

सनीने बेताब या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. सनी देओलने गदर, घायल आणि बॉर्डरसारख्या चित्रपटातील दमदार भूमिकेतून बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे. इतकेच नाही तर त्याने राजकारणातही प्रवेश केला आहे. २०१९ मध्ये पंजाबमधील गुरदासपूरमध्ये खासदार असलेला सनी देओल राजकारणात खूप लोकप्रिय आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sunny deol removes his chappal on petrol pump to beaten someone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.