Sunny Deol Love Life Secret, The Youngest Daughter Of The Dimple Kapadia Used to Call Him 'Daddy' | तुम्हाला माहीत आहे का? या अभिनेत्रीची छोटी मुलगी सनी देओलला म्हणायची 'छोटे पापा', दोघेही विवाहीत असूनही होते एक्स्ट्रा मॅरिटीअल अफेअर

तुम्हाला माहीत आहे का? या अभिनेत्रीची छोटी मुलगी सनी देओलला म्हणायची 'छोटे पापा', दोघेही विवाहीत असूनही होते एक्स्ट्रा मॅरिटीअल अफेअर

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी रोज घडत असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. अफेअर एक्स्ट्रा मॅरिटीयल अफेअर या गोष्टी चंदेरी दुनियेत पूर्वीपासून सुरू आहेत. एक काळ असा होता की डिंपल कपाडियाने एकापेक्षा जास्त हिट फिल्म देत सर्वाधिक लोकप्रिय अत्रिनेत्री बनली. डिंपल कपाडिया तिच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच लव्ह लाइफविषयीही चर्चेत राहिली. एक काळ असा होता की डिंपल कपाडिया आणि सनी देओलच्या अफेअरच्या बातम्या बर्‍याचदा चर्चेत राहिल्या. 

वयाच्या 16 व्या वर्षी डिंपल कपाडियाने 'बॉबी' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटापासून डिंपलने खूप पब्लिसिटी मिळवली.इंडस्ट्रीत करिअरमध्ये यशाच्या शिखरावर पोहचलेल्या डिंपलने  राजेश खन्नाबरोबर लग्न करण्याचे ठरवले. पण बर्‍याच कारणांमुळे दोघांचे वैवाहिक आयुष्यही सुरळीत राहिले नाही. दोघेही वेगळे राहू लागले.  मात्र राजेश खन्ना यांच्या सर्व कठीण काळात डिंपलनेच त्यांना आधार दिला. डिंपलचे राजेश खन्ना आणि  सनी देओलने पूजासह लग्न  केले होते. पण चित्रपटांसोबतच डिंपल आणि सनी देओलची खरी केमिस्ट्रीही समोर येत होती. २०१७ मध्येच डिंपल आणि सनी दोघेही लंडनमध्ये हातात हात घालून फिरताना दिसले होते.

'अर्जुन', 'मंजिल मंजिल', 'आग का गोला', 'गुनाह' आणि 'नरसिम्हा' सारख्या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केल्यानंतर  डिंपल आणि सनी दोघांची रियल लव लाइफ खूप चर्चेत राहिली. डिंपल काही वर्षे सनी देओलसह राहत असल्याचेही बोलले गेले. सनीने डिंपलला पत्नीचाही दर्जा दिला होता.जेव्हा दोघांचे अफेअर सुरू होते. तेव्हा डिंपलच्या दोन्ही मुली ट्विंकल आणि रिंकी खन्ना सनीला 'छोटे पापा' म्हणायची.


सनी देओलची पत्नी लाईमलाइट पासून राहते दूर

सनी देओलची पत्नी पूजा देओलला देखील लाईमलाइटमध्ये यायला आवडत नाही. मीडियाच्या कॅमे-या समोर ती क्वचितच पाहायला मिळते. अलीकडेच मुलगा करण देओलचा पहिला सिनेमा 'पल पल दिल के पास ’ सिनेमाच्या स्क्रिनिंगला तिने हजेरी लावली होती. एरव्ही कधीच समोर न येणारी पूजा देओल केवळ आपल्या मुला खातर मीडिया समोर आली होती. सनी देओल आणि पूजा देओलचे १९८४ मध्ये लग्न झाले आहे. या दोघांच्या लग्नाला ३६ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. सनीने त्याच्या करिअरला सुरूवात करण्याआधीच लग्न केले होते.

सनीने पूजासह केलेले लग्न ठेवले होते लपवून

जेव्हा मीडियामध्ये या दोघांच्या लग्नाच्या बातम्या यायला सुरू झाल्या तेव्हाही लग्नाची बातमी सनीने नाकारली होती. काही काळानंतर सनीनेच लग्न झाल्याची बातमी खरी असल्याची मीडियाला सांगितले होते. आजही सनीने आपली पत्नी आणि आपल्या लाइफ बद्दलच्या गोष्टी प्राइवेटच ठेवणे पसंत करतो.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sunny Deol Love Life Secret, The Youngest Daughter Of The Dimple Kapadia Used to Call Him 'Daddy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.