मोठ्या पडद्यावर नेहमी एक्शन आणि दमदार डायलॉगसाठी प्रसिद्ध असलेल्या सनी देओलने आजपर्यंत विविध भूमिका साकारत रसिकांची पसंती मिळवली आहे. सिनेमात दिसणारा सनी मात्र त्याच्या खऱ्या आयुष्यात  खूपच शांत आणि संयमी असा अभिनेता आहे. विशेष म्हणजे वेळेला तो खूप  महत्त्व देतो.  कोणतेही काम हे वेळेतच व्हायला हवे असा त्याचा नेहमी आग्रह असतो. सळसळता उत्साह, जोष, जल्लोष आणि मेहनत हेच  सनीच्या यशाचे खरं कारण आहे.आज सनीचे रूपेरी पडद्यावर दर्शन घडत नसले तरी त्याचे लाखो चाहते आजही त्याच्या प्रत्येक कामाला पसंती देत असतात. 


सनी देओलप्रमाणेचगोविंदाची लोकप्रियत अमाप आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने करतो.. त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही... कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही राहणार नाही असे गोविंदा मानतो. गोविंदा आणि सनी देओल हे दोघे लोकप्रिय चेहरे असल्यामुळे निर्मात्यांनी अनेकदा दोघांना एकत्र सिनेमात आणण्याचाही प्रयत्न केला पण आज पर्यंत दोघांनी एकत्र काम केले नाही. सनी देओलला वेळेतच काम करायला आवडते. त्याच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार तो काम करतो.  


सनी मैत्री जपण्यात अव्वल आहे. एकदा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदीने एक किस्सा शेअर करत सांगितले होते की, सनीने त्याच्यासाठी आठ चित्रपट नाकारले होते. उलट गोविंदा आहे. गोविंदा नेहमीच सेटवर उशीरा पोहचायची सवय होती. त्यामुळे अनेकदा गोविंदाला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले आहे. गोविंदाच्या याच एका वाईट सवयीमुळे सनी देओलने गोविंदा असलेल्या सिनेमात काम करण्यास कधीच होकार दिला नाही. 

बॉलिवूडमधले कॅट फाईटचे किस्से काही नवीन नाहीत. मात्र आम्ही आता तुम्हाला जरा वेगळी बातमी सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का 'डर' सिनेमानंतर बऱ्याच काळ शाहरुख खानशीसनी देओल बोलला नव्हता. 'डर'नंतर सनी देओल 16 वर्षे शाहरुख खानशी बोलत नव्हता. ऐवढंच नाही तर त्यानंतर सनीने कधीच यशराजच्या सिनेमातदेखील काम केले नाही. एका चॅट शो दरम्यान सनीने हा पुन्हा एकदा खुलासा केला  होता. 

 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sunny Deol and Govinda have not worked together in cinema till date, You will be surprised to read!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.