सुनिल शेट्टीला एक चुक पडली महागात,त्यामुळे बॉलीवुडमधले करियर झाले बरबाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 04:07 PM2021-09-18T16:07:12+5:302021-09-18T16:07:52+5:30

. 1992 मध्ये आलेल्या “बलवान” या चित्रपटातून अभिनेता सुनिल शेट्टीने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले होते.यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एक से बढकर एक भूमिका त्याने साकारत बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

Sunil Shetty made a big mistake, so his career in Bollywood was ruined | सुनिल शेट्टीला एक चुक पडली महागात,त्यामुळे बॉलीवुडमधले करियर झाले बरबाद

सुनिल शेट्टीला एक चुक पडली महागात,त्यामुळे बॉलीवुडमधले करियर झाले बरबाद

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरुवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही.अशाच कलाकारांच्या यादीत अभिनेता सुनिल शेट्टीही गणला जातो.

1992 मध्ये आलेल्या “बलवान” या सिनेमातून अभिनेता सुनिल शेट्टीने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एक से बढकर एक भूमिका त्याने साकारत बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. मात्र काही काळानंतर त्याची जादू कमी झाली आणि तो अभिनयापासून दूर गेला. सुनिल शेट्टी आज फारसा सिनेमात झळकत नसला तरी त्याचा बिझनेस आहे. अभिनयापासून दूर जात तो आज बिझनेस करण्यातच बिझी झाला आहे. 

सुनिल शेट्टीने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या फिल्मी करिअरविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. इंडस्ट्रीत जेव्हा अनेक ऑफर्स मिळत होत्या तेव्हा हुरळून गेलो. एक वेगळ्याच जगात वावरत होतो. पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळ्याच गोष्टी मिळत असताना इतर गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष करत राहिलो.

अनेकदा सिनेमाच्या ऑफर्स मिळतायेत म्हणून सरसकट त्या स्विकारल्या. कामाच्या बाबतीत अजिबात सिलेक्टीव्ह नव्हतो. सिनेमाची स्क्रिप्ट न वाचताच ऑफर्स स्विकारल्या आणि त्याच गोष्टीचा जबर फटका सहन करावा लागला. काही सिनेमे हिट ठरलेत तर काही फ्लॉप. फ्लॉप सिनेमांमुळेच माझी इमेजही बदलत गेली आणि ऑफर्सही मिळणे कमी झाले. 

माझी आत्ताची स्तिथी पाहून माझ्यावर कोणीच पैसा खर्च करु इच्छित नाही. ५० कोटी खर्च करुनसुद्धा निर्मांत्यांना फायदा होणार नाही. याउलट निर्माते अक्षय कुमारवर ५०० कोटी खर्च करतील. कारण आज अक्षय यशशिखरावर आहे. ते यश माझ्याकडे नाही. आयुष्यात केलेल्या काही चुकांमुळेच करिअर संपल्याचे सुनिल शेट्टीने सांगितले होते. 

Web Title: Sunil Shetty made a big mistake, so his career in Bollywood was ruined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.