ठळक मुद्देसुनील शेट्टी अत्यंत खोडकर असल्याने हे त्याचेच काम आहे, अशी अफवा पसरली. या अफवेबद्दल सुनील शेट्टीने खुलासा केला की, महिमाचा आजतागायत हाच समज आहे की, तिच्या कारच्या इंजिनमध्ये साप ठेवणारा मीच होतो. पण मला स्वतःलाच सापाची भीती वाटते.

बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी आणि अभिनेता सुदीप किच्चा हे लवकरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कॉमेडी शो द कपिल शर्मा शो मध्ये त्यांचा आगामी चित्रपट पैलवानचे प्रमोशन करायला हजेरी लावणार आहेत. हा चित्रपट एक स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा असून या कार्यक्रमात येऊन हे दोघे प्रचंड धमाल मस्ती करणार आहेत. त्यांनी या कार्यक्रमात आपल्या वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनातील काही गुपितेही सांगितली. अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या चतुर बोलण्याने प्रेक्षकांना प्रभावित केले. तसेच गंमती गंमतीत कपिल शर्माने सुनील शेट्टी आणि सनी देओल यांच्या नृत्य कौशल्यातील साम्य दाखवून दिले.


 
या शो दरम्यान कपिल शर्मा सुनील शेट्टी आणि सनी देओलशी संबंधित काही अफवांबद्दल चौकशी करताना दिसणार आहे. कपिल सुनीलला विचारणार आहे की, सुनील आणि सनी यांचा ॲक्शन डायरेक्टर आणि डान्स डायरेक्टर एकच आहे असे म्हटले जाते हे खरे आहे का? कारण त्यांच्या दोघांचे नृत्य काहीसे ॲक्शनसारखेच दिसते. यावर हसतहसत सुनील म्हणाला, “होय, आम्ही कधी कधी असे नृत्य करतो, की जणू एखादे ॲक्शन दृश्यच करत असू. आम्ही डान्स करणे खूप एन्जॉय करतो.  

तसेच कपिलने सुनीलच्या खोडकरपणाविषयी विचारले. तो म्हणाला, एकदा सुनील शेट्टी आणि महिमा चौधरी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होते. त्यावेळी तिच्या कारच्या इंजिनखाली एक साप दिसला. सुनील शेट्टी अत्यंत खोडकर असल्याने हे त्याचेच काम आहे, अशी अफवा पसरली. या अफवेबद्दल सुनील शेट्टीने खुलासा केला की, महिमाचा आजतागायत हाच समज आहे की, तिच्या कारच्या इंजिनमध्ये साप ठेवणारा मीच होतो. पण मला स्वतःलाच सापाची भीती वाटते. मी तिला अनेकदा सांगितले की, हे काम माझे नाही, तर इतर कुणाचे तरी आहे.”


 
या कार्यक्रमात पुढे सुनील शेट्टीने त्याला येत असलेल्या अनेक भाषांविषयी सांगितले. तसेच सुदीपशी अनेक वर्षांपासून असलेल्या मैत्रीचे किस्से देखील सांगितले.

Web Title: sunil shetty hide snake in mahima chaudhary car engine reveals on the kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.