लंडनमध्ये अडकली ही मराठमोळी अभिनेत्री, तिला पाहण्यासाठी घराखाली चाहते करताहेत गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 08:00 AM2020-06-24T08:00:00+5:302020-06-24T08:00:02+5:30

ही अभिनेत्री लॉकडाउनमुळे लंडनमध्येच अडकली आहे.

Stuck in London, this Marathi actress is crowded under her house to see her | लंडनमध्ये अडकली ही मराठमोळी अभिनेत्री, तिला पाहण्यासाठी घराखाली चाहते करताहेत गर्दी

लंडनमध्ये अडकली ही मराठमोळी अभिनेत्री, तिला पाहण्यासाठी घराखाली चाहते करताहेत गर्दी

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सध्या लंडनमध्ये आहे. लॉकडाउनमुळे ती लंडनमध्येच अडकली आहे. मात्र काळात तिने परदेशातही स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. परिणामी तिला पाहण्यासाठी दररोज तिच्या घराबाहेर गर्दी होते.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने लंडनमध्ये येणारा अनोखा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ती म्हणाली, “भारतीय वेब सीरिज आता लंडनमध्येही मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जात आहेत. परिणामी विदेशातील प्रेक्षकही आता मला अभिनेत्री म्हणून ओळखू लागले आहेत. दररोज माझ्या घरासमोर मला पाहण्यासाठी गर्दी होते. सुरुवातीला हे मजेशीर वाटले, पण आता त्याचा त्रास होतोय. कधीही कोणीही मला पाहून रस्त्यांवर जोरजोराने ओरडू लागेल याचा पत्ता नाही. असा प्रकार तीन चार वेळा माझ्यासोबत घडला आहे.”


राधिका आपटे हिच्या सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरुवात मराठी चित्रपटसृष्टीपासून केली आहे. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव आहे घो मला असला हवा. घो मला असला हवा हा चित्रपट २००९ साली रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती केबीसी प्रोडक्शन्सने केली असून या चित्रपटात राधिकाने गावातील सावित्री या महिलेची भूमिका केली होती.

राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ चित्रपटात काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

Web Title: Stuck in London, this Marathi actress is crowded under her house to see her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.