Southern superstar Mahesh Babu launches 'Thank You Brother' motion poster on social media | दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने 'थँक्यू ब्रदर'चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर केले लाँच

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने 'थँक्यू ब्रदर'चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर केले लाँच

सुपरस्टार महेश बाबूने ‘थँक्यू ब्रदर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण केले. ‘थँक्यू ब्रदर’! हा आगामी तेलगू चित्रपट असून तो दिग्दर्शित केला आहे रमेश रापर्ती यांनी.  अनसूया भारद्वाज आणि विराज अश्विन हे यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात मौनिका रेड्डी, अनिश कुरुविला, अर्चना अनंत, विवा हर्ष, अन्नपूर्णाम्मा आणि आदर्श बालकृष्ण यांच्याही मुख्य भूमिका आहेत.


अभिनेता महेश बाबूने डिजिटल प्लॅटफॉर्मवर थँक्यू ब्रदरचे मोशन पोस्टर आज प्रदर्शित केले आहे. त्याने मोशन पोस्टरचा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, थँक्यू बद्ररचा मोशन मोस्टर सादर करताना मला आनंद होत आहे. थ्रिलिंग वाटतो आहे आणि संपूर्ण टीमला खूप यश मिळो.


थँक्यू ब्रदर! मोशन पोस्टरच्या लाँचिंगवर प्रतिक्रिया व्यक्त करताना या चित्रपटातील अभिनेत्री अनसूया भारद्वाज म्हणाली ” थँक्यू ब्रदर! हा एक अत्यंत मनोरंजक आणि आव्हानात्मक प्रोजेक्ट असून त्याचा मी एक भाग आहे. हा चित्रपट म्हणजे एका गरोदर महिलेची (अनसूया भारद्वाज) आणि लक्षाधीश प्लेबॉय (विराज अश्विन) ची कहाणी आहे, ज्यामध्ये लॉकडाउन नंतरच्या परिस्थितीत ते दोघे एकमेकांच्या असामान्य परिस्थितीत एकमेकांचा समोरासमोर येतात. पुढे काय घडते आणि विराज अश्विन आणि मी या संकटातून बाहेर पडलो की नाही, आम्ही या संकटात कसे पडलो हे जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे  

आणि असे बरेच काही; पण जे मी आत्मविश्वासाने सांगू शकते की, ते म्हणजे ‘थँक्यू ब्रदर!’ हा भावनांचा एक रोलर कोस्टर असणार आहे. हा चित्रपट माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे आणि इतर सर्वांप्रमाणे मीदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत आहे."

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Southern superstar Mahesh Babu launches 'Thank You Brother' motion poster on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.