south superstar thala ajith kumar fan committed suicide user reaction on it | साऊथ सुपरस्टार अजित कुमारच्या ‘सुपरफॅन’ची आत्महत्या; फॅन असा की अंगभर गोंदवले होते टॅटू

साऊथ सुपरस्टार अजित कुमारच्या ‘सुपरफॅन’ची आत्महत्या; फॅन असा की अंगभर गोंदवले होते टॅटू

ठळक मुद्देसाऊथ सुपरस्टार अजित कुमारला थाला नावानेही ओळखले जाते. 1990 साली ‘एन वीजु एन कानावर’ या तामिळ सिनेमातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.

काही दिवसांपूर्वीच साऊथ सुपरस्टार यशच्या एका चाहत्याने आत्महत्या केली होती. यशने माझ्या अंतिमयात्रेत सहभागी व्हावे, अशी अंतिम इच्छा सुसाईड नोटमध्ये लिहित त्याने मृत्यूला कवटाळले होते. आता आणखी एका साऊथ सुपरस्टारच्या चाहत्याने असेच मृत्यूला कवटाळले आहे. तामिळ सुपरस्टार अजित कुमार याच्या एका चाहत्याने आत्महत्या केली आहे. अजित कुमारच्या या चाहत्याच्या आत्महत्येची बातमी सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतेय.

या चाहत्याचे नाव प्रकाश असल्याचे कळते.  तो अजितचा इतका मोठा फॅन होता, की त्याने आपल्या अख्ख्या शरीरभर अजितचे फोटो आणि नावाचे टॅटू कोरले होते. इतकेच नाही, अजितचा कुठलाही नवा सिनेमा प्रदर्शित झाला की, तो त्या नावाचा टॅटू कोरत असे.  

प्रकाशला सोशल मीडियावर अजितचा सुपरफॅन म्हणून ओळखले जायचे. साहजिकच त्याच्या आत्महत्येची बातमी ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. 

 प्रकाशने आत्महत्या का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक कारणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा कयास आहे. अजितच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे या सुपरफॅनला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ युजर्सनी शेअर केले आहेत. यात प्रकाशने अंगभर कोरून घेतलेले अजितच्या नावाचे टॅटू दिसत आहेत.

साऊथ सुपरस्टार अजित कुमारला थाला नावानेही ओळखले जाते. 1990 साली ‘एन वीजु एन कानावर’ या तामिळ सिनेमातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. सिंगर एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी अजित कुमारला चित्रपटात आणले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: south superstar thala ajith kumar fan committed suicide user reaction on it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.