ठळक मुद्देतामिळनाडूत जन्मलेल्या राम्याने ‘माने थयने पुनमाने’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती.  

एका साऊथ अभिनेत्रीचे न्यूड फोटो लीक होण्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे राम्या पंडियन. राम्याचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि खळबळ माजली.
नुकतेच राम्याने सिंपल ब्ल्यू साडीतील फोटो  सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोंशी छेडछाड करत काही सोशल अकाऊंटवर राम्याचे सेमी न्यूड फोटो पोस्ट केले गेलेत. हे फोटो लगेच व्हायरल झालेत. या प्रकारानंतर राम्याने एक पोस्ट लिहित आपला संताप व्यक्त केला.


‘सोशल मीडियाच्या काही अकाऊंटवरून माझे काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले जात आहेत. हा सगळा प्रकार माझी प्रतिमा मलीन करणारा आहे. हा घाणेरडा प्रकार करणाºयांना कृपया ट्रॅक करा. मी ती कुणी व्यक्ति असो वा संस्था मी त्याविरोधात कठोर कारदेशीर कारवाई करेल. घडलेल्या प्रकाराची माहिती देणाºयांचे मी आभार मानते,’ असे राम्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.


राम्याच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला पाठींबा देत, आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणा-यांना आपण शोधून काढू, असा निर्धार व्यक्त केला आहे.

तामिळनाडूत जन्मलेल्या राम्याने ‘माने थयने पुनमाने’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती.  राम्याप्रमाणेच अनेक अभिनेत्रींचे आक्षेपार्ह फोटो यापूर्वी लीक झाले आहेत.

Web Title: south indian actress ramya pandian semi nude photo leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.