south indian actress nikki galrani dances with school watchman |  शाळेच्या वॉचमन काकांसोबत अभिनेत्रीने केला धम्माल डान्स, इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय हा व्हिडीओ

 शाळेच्या वॉचमन काकांसोबत अभिनेत्रीने केला धम्माल डान्स, इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय हा व्हिडीओ

ठळक मुद्देनिक्की गलराणी  इडियट  आणि  राजवंशम या चित्रपटात झळकणार आहे. अलीकडेच निक्कीने अभिनय क्षेत्रात सात वर्ष पूर्ण केली आहेत.

इंटरनेटवर एक व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालतोय. होय, हा व्हिडीओ आहे एका अभिनेत्रीच्या डान्सचा. होय, निक्की गलराणी नावाची साऊथ अभिनेत्रीने चक्क शाळेच्या वॉचमन काकांसोबत ठेका धरला आणि त्याचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला. वॉचमन काकाही असे काही रंगात आलेत की, त्यांनी निक्कीला चार-दोन डान्स स्टेप्स शिकवल्या.  
 निक्की गलराणी  सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. एका शाळेत सिनेमाचे शूटींग सुरु होते. शाळेतील वॉचमन काकांसोबत अशावेळी सर्वांचीच गट्टी जमली. निक्की आणि वॉचमन काका यांची तर विशेष मैत्री झाली. या काकांसोबतचा डान्स व्हिडीओ निक्कीने शेअर केला आहे.

‘आयुष्यात आनंदाचे क्षण फार कमी असतात. नेहमीच मनाजोगे हे क्षण साजरा करतात येते, असे नाही. पण सध्या आम्ही येथे आहोत, तिथे डान्स पार्टी तर करूच शकतो,’ असे लिहित निक्कीने काकांसोबतचा धम्माल डान्स व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत निक्कीपेक्षा वॉचमन  काकांच्या चेह-यावरचा आनंद बरेच काही सांगणारा आहे. कदाचित म्हणूनच हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.  

निक्की गलराणी  इडियट  आणि  राजवंशम या चित्रपटात झळकणार आहे. अलीकडेच निक्कीने अभिनय क्षेत्रात सात वर्ष पूर्ण केली आहेत. निक्कीने ‘1983’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.  मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषांमध्ये सुमारे 30 चित्रपट तिले  केले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: south indian actress nikki galrani dances with school watchman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.