Sooraj Pancholi Strongly Denies Link To Disha Salian's Death, Calls Rumours Insensitive | धक्कादायक! सुशांतची एक्स मॅनेजर सूरज पंचोलीच्या मुलाची होणार होती आई ?, याबाबत सूरजने केला आता हा खुलासा

धक्कादायक! सुशांतची एक्स मॅनेजर सूरज पंचोलीच्या मुलाची होणार होती आई ?, याबाबत सूरजने केला आता हा खुलासा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचे चाहते सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. सोशल मीडियावर नेपोटिझममुळे सलमान खान व करण जोहरला ट्रोल करत आहेत. यादरम्यान सूरज पंचोलीवरदेखील चाहते निशाणा साधत आहेत. सोशल मीडियावर सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्ये प्रकरणी सूरज पंचोलीवर टीका केली जात आहे. मात्र आता या अफवा फोल ठरवित सूरजने खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत सूरजने सांगितले की, मी दिशाला ओळखत नाही. मी तिला कधीच भेटलो नाही. दिशाबद्दल तिच्या निधनानंतर तिच्याबद्दल समजले आणि सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून माहित पडले. मी कधीच तिच्याशी बोललो नाही, मला माहित नाही ती कशी दिसत होती. पण, जी या जगात नाही, तिच्याबद्दल असे बोलणे योग्य नाही. मुलीचे कुटुंब, तिचे भाऊ बहिणीबद्दल विचार करा.

तो पुढे म्हणाला की, हे खूप निराशाजनक आहे कारण ते माझ्याबद्दल लिहित नाहीत तर त्या व्यक्तीबद्दल लिहत आहे जे आता या जगात नाही. ज्या लोकांकडे करण्यासाठी काहीही नाही त्यांनी हे सिनेमाच्या स्क्रिप्टसारखे लिहिले आहे. मला वाटते की माझा वेळ वाया घालवत आहे स्टेटमेंट देऊन.

दिशाने सुशांतच्या आत्महत्येच्या दोन आठवड्यांपूर्वी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशाच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

View this post on Instagram

#StopSpreadingFakeNews @sonupii

A post shared by Sooraj Pancholi (@soorajpancholi) on

यादरम्यान काही युजर्सनी आपल्या पोस्टमध्ये दावा केला की सूरज पंचोली सुशांतची माजी मॅनेजर दिशा सालियनला डेट करत होता. असेही बोलले जाते की दिशा प्रेग्नेंट होती आणि त्यामुळे तिने आत्महत्या केली. असेही बोलले जात आहे की सुशांतला या गोष्टीची माहिती होती आणि त्याला दिशाला मदत करायची होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sooraj Pancholi Strongly Denies Link To Disha Salian's Death, Calls Rumours Insensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.