ये कौन सा डिझाइन है आंटी? सोनम कपूरचा विचित्र ड्रेस पाहून युजर्सने पुन्हा केले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 12:48 PM2021-04-02T12:48:10+5:302021-04-02T12:48:30+5:30

सोनम कपूरचे (Sonam Kapoor) कपडे आणि स्टाईल बघून अनेकदा तिचे हसे होते. पण पर्वा करेल ती सोनम कुठली?

sonam kapoor trolled for her latest magazine photoshoot people called her vulgar | ये कौन सा डिझाइन है आंटी? सोनम कपूरचा विचित्र ड्रेस पाहून युजर्सने पुन्हा केले ट्रोल

ये कौन सा डिझाइन है आंटी? सोनम कपूरचा विचित्र ड्रेस पाहून युजर्सने पुन्हा केले ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी सोनमने असाच एक ड्रेस घातला होता. तेव्हाही ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.

सोनम कपूर  (Sonam Kapoor) तिच्या सिनेमांपेक्षा फॅशन व स्टाईलमुळे चर्चेत राहते. सोनमचे कपडे आणि स्टाईल बघून अनेकदा तिचे हसे होते. पण पर्वा करेल ती सोनम कुठली? बोल्ड फॅशन अतिशय आत्मविश्वासाने कॅरी करणारी सोनम कदाचित म्हणूनच बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाते. ट्रॅडिशनल असो की वेस्टर्न अनेकदा सोनम असे काही कपडे घालते की, यामुळे ती ट्रोलही होते. सध्याही याच कारणामुळे सोशल मीडिया युजर्स तिची खिल्ली उडवत आहेत. (Sonam Kapoor Trolled) 

सोनमने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केलेत. Harper's Bazaar India या मॅगझिनसाठी तिने हे फोटोशूट केले. यातला एक फोटो पाहून नेटकरी असे काही हैराण झालेत की, त्यांनी सोनमला ट्रोल करणे सुरू केले.

या फोटोत सोनमने सिल्क डजेस सॅटीन ड्रेस व ट्राऊजर्स कॅरी केला आहे. लोकांना तिचा हा अवतार फार भावला नाही. मग काय, ये कौन सा डिझाइन है आंटी? अशा विचित्र कमेंट अनेकांनी केल्या.

काहींनी या ड्रेसला वल्गर म्हटले तर काही सोनमचा हा अवतार पाहून हसू आवरू शकले नाहीत.

काही दिवसांपूर्वी सोनमने असाच एक ड्रेस घातला होता. तेव्हाही ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.  2018 मध्ये सोनमने आनंद आहुजाशी लग्न केले. आनंद आहूजामुळे जास्त चर्चेत असते.आनंदही व्यवसाय जगतात एक मोठे नाव आहे.

रिपोर्टनुसार आनंद आहूजाची वार्षिक कमाई 450 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार 3000 कोटी इतकी आहे. सोनम आणि आनंद एकत्र मिळून वषार्ला सुमारे 3085 कोटी रुपये कमवतात. ज्यामुळे दोघेही बॉलिवूडमधील एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत जोडी मानली जाते.

Web Title: sonam kapoor trolled for her latest magazine photoshoot people called her vulgar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.