sonam kapoor hits back at trolls targeting her sindhi peshawari lineage | सोशल मीडियावर का शेअर होतोय अनिल कपूर यांचा हा फोटो?

सोशल मीडियावर का शेअर होतोय अनिल कपूर यांचा हा फोटो?

ठळक मुद्देट्रोल करणा-यांना सोनमनेही सडेतोड उत्तर दिले आहे.

 सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा एक फोटो शेअर केला जात आहे. होय, या फोटोत अनिल कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत दिसत आहेत. या फोटोवरून सध्या अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूर हिला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी सोनमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचे कारण म्हणजे, नुकत्याच एका मुलाखतीत सोनम कपूरने केलेले वक्तव्य. होय, काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना, माझ्या कुटुंबाची पाळंमुळे पाकिस्तानात असल्याचे सोनम कपूर म्हणाली होती. मी अर्धी सिंधी तर अर्धी पेशावरी असल्याचेही तिने म्हटले होते. नेमक्या याचमुळे सोनम सध्या ट्रोल होत आहे.
ट्रोलर्सनी सोनमला ट्रोल करत, अनिल कपूर यांचा दाऊदसोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘माझे पाकिस्तानशी नाते असल्याचे सोनम म्हणते, तिला हेच तर सुचवायचे नाही ना, ’ असे एका युजरने अनिल यांचा फोटो शेअर करत लिहिले आहे.  

अनेकांनी तिला पाकिस्तानात जाऊन राहण्याचा सल्ला दिला. काहींनी ही भारताची नवी ‘राखी सावंत’ अशा शब्दांत सोनमला ट्रोल केले.

ट्रोलर्सला दिले उत्तर
 ट्रोल करणा-यांना सोनमनेही सडेतोड उत्तर दिले आहे. ‘ जरा शांत व्हा. एखाद्याला ट्रोल केल्याने तुम्हालाच त्रास होईल. त्यापेक्षा तुम्ही स्वत:कडे पाहा, तुम्ही कोण आहात हे आधी ओळखा आणि मग मला ट्रोल करा, असे टिष्ट्वट तिने केले.  

काय म्हणाली सोनम?
कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरच्या प्रतिक्रिया अद्यापही थांबलेल्या नाहीत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सोनम या मुद्यावर बोलली आणि बोलताच ट्रोल झाली. होय, सध्याची परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. परंतु मी खूप मोठी देशभक्त आहे. माझे म्हणाल तर सध्या माझ्यासाठी शांत राहणेच योग्य आहे. कारण माझ्या मते, हा काळ सुद्धा निघून जाईल. आपला देश ७० वर्षांपूर्वी एकसंध होता आणि आताचे विभाजनाचे राजकारण पाहून मन हेलावणारे आहे, असे सोनम यावेळी म्हणाली.‘हे प्रकरण फार गुंतागुंतीचे आहे. कारण सगळीकडे वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, त्यामुळे सत्य काय हेच मला कळत नाही. पूर्ण माहिती असेल तेव्हाच मी अधिकारवाणीने बोलू शकेल. पण मी एक कलाकार आहे आणि या नात्याने माझे काम सर्वत्र दिसावे, हीच माझी इच्छा आहे. ‘नीरजा’ पाकिस्तानात दाखवला गेला नाही. ही गोष्ट मला प्रचंड दुखावणारी होती. कारण माझी पाकिस्तानात खूप मोठी फॅन फॉलोर्इंग आहे. सिंधी असल्यासोबतच मी पेशावरीसुद्धा आहे, असेही सोनम म्हणाली. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sonam kapoor hits back at trolls targeting her sindhi peshawari lineage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.