Sonakshi Sinha gives a befitting reply on Salman Khan romancing a 21-year-old in Dabangg 3 | पन्नाशीच्या सलमान खानचा 21 वर्षांच्या सई मांजरेकरशी ऑनस्क्रीन रोमान्स...! सोनाने दिले हे उत्तर!! !!
पन्नाशीच्या सलमान खानचा 21 वर्षांच्या सई मांजरेकरशी ऑनस्क्रीन रोमान्स...! सोनाने दिले हे उत्तर!! !!

ठळक मुद्देसलमान व सईशिवाय सोनाक्षी सिन्हा, किच्चा सुदीप ‘दबंग 3’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

भाईजान सलमान खानचा ‘दबंग 3’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सल्लू भाई पुन्हा एकदा चुलबुल पांडेचे आयकॉनिक कॅरेक्टर साकारताना दिसणार आहे. रज्जोच्या भूमिकेत सोनाक्षी सिन्हा ही सुद्धा चित्रपटाचा भाग आहे. याशिवाय महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर ही सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. सईचा हा पहिला चित्रपट असल्याने साहजिकच ती आकर्षणाचा भाग आहे. पण आता सईवरून  एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. होय, 21 वर्षांच्या सईने 53 वर्षांच्या सलमानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करावा, हे अनेकांना रूचलेले नाही. अलीकडे सोनाक्षी सिन्हाला यावरून छेडले गेले.  पण वयातील फरकावर सोनाक्षीने वेगळेच उत्तर दिले.

53 वर्षांचा सलमान 21 वर्षांच्या सईशी रोमान्स करतो, हे लोकांना चालते. पण कधीच वयाने मोठी हिरोईन तिच्यापेक्षा लहान हिरोशी रोमान्स करताना दाखवले जात नाही, असे का? असा प्रश्न सोनाक्षीला विचारण्यात आला. यावर हा प्रश्न तुम्ही मला नाही तर सलमानला विचारायला हवा. सलमान असे काय खातो की, तो अजुनही तरूण दिसतो आणि कमी वयाच्या हिरोईनसोबत रोमान्स करतो, हा प्रश्न त्याच्यासाठी आहे, असे सोनाक्षी म्हणाली.
 


मी 50 वर्षांनी असते आणि मला कुणी 22 वर्षांच्या मुलासोबत  ऑनस्क्रीन रोमान्स करायला सांगितले असते, तर मला ते विचित्र वाटले असते. समाजाही असे काही मान्य करत नाही. पण मोठ्या वयाचा हिरो लहान वयाच्या हिरोईनसोबत रोमान्स करतो, हे समाजाने मान्य केले आहे, असेही ती म्हणाली.

Web Title: Sonakshi Sinha gives a befitting reply on Salman Khan romancing a 21-year-old in Dabangg 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.