ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सोनाक्षी लवकरच ‘दबंग 3’ या सिनेमात झळकणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक फॅशनेबल आणि ग्लॅमरस दिसण्याची जणू स्पर्धा सुरु असते. या अभिनेत्रीचे फॅशन ट्रेंड आणि त्यांच्या प्रत्येक एका ड्रेसवर मीडियाची नजर असते. साहजिकच फॅशनेबल दिसण्याच्या नादात एखादीने जराही कॉपी केली की, ती चोरी लगेच पकडल्या जाते. असेच काही दिसले ते सोनाक्षी सिन्हाबद्दल. होय, सोनाक्षीने जो ड्रेस निवडला, तो ड्रेस मलायका अरोराच्या ड्रेसची कॉपी होता. मग काय, ही कॉपी लगेच पकडल्या गेली. सोशल मीडियावर तर सोनाक्षीने केलेल्या या ‘कॉपी’चा चांगलाच बोभाटा झाला. सोनाक्षीने मलायकाचा ड्रेस चोरला, अशा मजेशीर प्रतिक्रिया नेटक-यांनी दिल्या.


नुकत्याच झालेल्या वोग ब्युटी अवार्डमध्ये मलायकाने व्हाईट कलरचा डीप नेक ड्रेस परीधान केला होता. या सुपर स्टाइलिश आणि रिव्हिलिंग ड्रेसमध्ये मलायका नेहमीप्रमाणे हॉट आणि सेक्सी दिसली होती. यानंतर सोनाक्षीने अगदी मलायकासारखा ड्रेस घातला.

या ड्रेसमध्ये थोडा फरक आहे. पण तरीही लोकांनी सोनाक्षीला ट्रोल करणे सुरु केले. चर्चा खरी मानाल तर सोनाक्षी आणि मलायकाचा ड्रेस एकाच डिझाईनरने डिझाईन केला आहे.


लोकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. ‘सोनाक्षी आंटीने मलायका आंटी की ड्रेस चुराई,’ असे एका युजरने लिहिले. अद्याप सोनाक्षीने यावर उत्तर दिलेले नाही. ती यावर काय उत्तर देते, ते बघूच.


वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सोनाक्षी लवकरच ‘दबंग 3’ या सिनेमात झळकणार आहे. यात ती रज्जोची भूमिका साकारताना दिसेल. कालच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.  

Web Title: sonakshi sinha dress going viral on social media fans compare with malaika arora dress in vogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.