सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा, आलिया भट्टचे यावर्षी होणार ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 10:29 AM2018-02-07T10:29:56+5:302018-02-07T15:59:56+5:30

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होणे ही गोष्ट काही नवीन राहिलेली नाही. इकडे रोज जोड्या बनतात आणि टूटतात. गेल्या काही ...

Sonakshi Sinha disclosed that breakup of Alia Bhatt will be done this year | सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा, आलिया भट्टचे यावर्षी होणार ब्रेकअप

सोनाक्षी सिन्हाने केला खुलासा, आलिया भट्टचे यावर्षी होणार ब्रेकअप

googlenewsNext
लिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होणे ही गोष्ट काही नवीन राहिलेली नाही. इकडे रोज जोड्या बनतात आणि टूटतात. गेल्या काही दिवसांपासून चुलबुली गर्ल आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ब्रेकअपची चर्चा आहे. सोनाक्षी सिन्हाने आलियाच्या रिलेशनशीपवरील चर्चेवरून पर्दा उचलला आहे. नेहा धूपियाच्या चॅटशोमध्ये शोमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि मनीष मल्होत्रा आले होते.  शोच्या एका प्रोमोमध्ये नेहा सोनाक्षीला प्रश्न विचारताना दिसते आहे की कोणती जोडी 2018मध्ये तुटणार आहे ?, नेहाच्या या प्रश्नावर चटकन सोनाक्षीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांचे नाव घेतले. सोनाक्षी सिन्हाच्या या उत्तरावरून सिद्धार्थ आणि आलियात काही तरी नक्कीच शिजते होते.  

नेहाने जेव्हा पॅचअपबाबत हा प्रश्न विचारला तेव्हा सोनाक्षीने मनीषकडे फक्त पाहिले तर सोनाक्षी उत्तर द्यायच्या आधीच मनीषने रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे नाव घेतले. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील जवळी वाढत चालली असल्याची चर्चा आहे.  रणबीर हा आलियाचा ‘फर्स्ट क्रश’ आहे. त्याच्यासोबत काम करणे, हे आलियाचे स्वप्न होते आणि ‘ब्रह्मास्त्र’ने आलियाचे हे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याचा परिणाम म्हणजे, सध्या जो दिसेल त्याच्याजवळ आलिया हे बोलून दाखवते आहे. रणबीरबद्दल बोलताना ती जराही थकत नाहीय. एकंदर काय तर तूर्तास आलिया पुरती ‘रणबीरमय’ ​झाली आहे.

ALSO READ : आलिया भट्ट झाली ‘रणबीरमय’! लपता लपत नाहीयं चेह-यावरची उत्सुकता!!

ब्रह्मास्त्र चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर आणि आलिया एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.या चित्रपटात रणबीर आलियाशिवाय बिग बी अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहेत. हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' असे ठरवण्यात आले होते. अयान मुखर्जी अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होता. ज्यात एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहेत. 

Web Title: Sonakshi Sinha disclosed that breakup of Alia Bhatt will be done this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.