Watch Viral Video : हातात बेडया; काय सोनाक्षी सिन्हाला झाली अटक?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:06 PM2019-08-06T15:06:06+5:302019-08-06T15:09:43+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून वादांमुळे चर्चेत आहे. सोनाक्षीवर फसवणुकीचा आरोप आहे. याशिवाय वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोपही तिच्यावर होतोय. याचदरम्यान सोनाक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

sonakshi sinha arrested by police watch viral video | Watch Viral Video : हातात बेडया; काय सोनाक्षी सिन्हाला झाली अटक?

Watch Viral Video : हातात बेडया; काय सोनाक्षी सिन्हाला झाली अटक?

googlenewsNext
ठळक मुद्देगत रविवारी देशात अनेक ठिकाणी वाल्मिकी समाजाने सोनाक्षीचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून वादांमुळे चर्चेत आहे. सोनाक्षीवर फसवणुकीचा आरोप आहे. याशिवाय वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोपही तिच्यावर होतोय. याचदरम्यान सोनाक्षीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत सोनाक्षीच्या हातात बेड्या आहेत. सध्या सोशल मीडियावर #AsliSonaArrested ट्रेंड होतोय.
‘मी काहीही चुकीचे केलेले नाही. तुम्ही मला यापद्धतीने अटक करू शकत नाही,’ असे सोनाक्षी यात म्हणताना दिसतेय. तिच्या हातात बेड्या ठोकल्याचेही स्पष्ट दिसतेय. विरल भयानीने हा व्हिडीओ त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.

सोनाक्षीला खरचं अटक झाली का आणि झाली असेल तर कुठल्या आरोपात? हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. व्हिडीओच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. अद्याप सोनाक्षीने यासंदर्भात कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. तिच्या टीमनेही याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही.


गत रविवारी देशात अनेक ठिकाणी वाल्मिकी समाजाने सोनाक्षीचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. सोनाक्षीने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत वाल्मिकी समाजाविरोधात अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. देशभरात याविरोधात निषेधाचे सूर उमटल्यानंतर सोनाक्षीने याप्रकरणी माफी मागितली होती. 23 जुलै 2019 रोजी सिद्धार्थ कनन यांच्यासोबतच्या माझ्या मुलाखतीसंदर्भात मी सांगू इच्छिते की, वाल्मिकी समाजाबद्दल माझ्या मनात आदर आहे. अजाणतेपणी माझ्या तोंडून निघालेल्या शब्दांनी मी कुण्या एका व्यक्तिच्या, समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी नम्रपणे माफी मागते. कुणाच्याही भावना दुखावण्याचा वा विशिष्ट समाजाचा अपमान करण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता, असे टिष्ट्वट सोनाक्षीने केले होते.

Web Title: sonakshi sinha arrested by police watch viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.