Singer SP Balasubrahmanyam dies Salman Khan and A R Rahman pay condolences | एसपी बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे सलमानला धक्का, रहमान म्हणाला - बिथरलोय...

एसपी बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे सलमानला धक्का, रहमान म्हणाला - बिथरलोय...

महान गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं शुक्रवारी दुपारी निधन झालंय. ते कोरोना संक्रमणाशी लढत होते. उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाची बातमी समोर येताच इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी दु:खं व्यक्त करत आहेत. ज्यात सलमान खान आणि संगीतकार ए.आर.रहमान यांचाही समावेश आहे.

सलमान खान याने ट्विट करून लिहिले की, 'एसपी बालसुब्रमण्यम सरांबाबत ऐकून मन फार दुखावलं आहे. तुम्ही नेहमी म्युझिकच्या इतिहासात जिवंत रहाल. परिवारासोबत माझी सहानुभूती. #RIP.'

ए.आर. रहमान ने ट्वीट करून लिहिले की, ''ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो। बिथरलो आहे.'

गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं कोरोनामुळे निधन झालं. बालसुब्रमण्यम यांना सलमान खानचा आवाजाच्या रूपात ओळखलं जातं. त्यांनी सलमानसाठी अनेक हिट गाणी गायली आहेत. गुरूवारी त्यांची तब्येत गंभीर झाल्यावरही सलमानने ते लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करणारं ट्विट केलं होतं.

सलमानने ट्विट केलं होतं की, बाला सुब्रमण्यम सर, तुम्ही लवकर बरे व्हावेत यासाठी मनापासून प्रार्थना करतो. तुम्ही जेही गाणी माझ्यासाठी गायली ती खास करण्यासाठी खूप धन्यवाद. तुमचा दिल दिवना हिरो प्रेम. लव्ह यू सर'.

एसपी बालसुब्रमण्यम यांनी अनेक हिंदी गाणी गायलीत. पण त्यांनी सलमानसाठी गाणी गायल्यावर ते घराघरात जाऊन पोहोचले. 'मैने प्यार किया' ची त्यांनी गायलेली गाणी सुपरहिट ठरली होती. आजही त्यांची ही गाणी आवडीने ऐकली जातात. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

हे पण वाचा :

एसपी बालसुब्रमण्यम यांना व्हायचं होतं इंजिनिअर, एका दिवसात २१ गाणी गाऊन केला होता रेकॉर्ड

एस.पी. बालसुब्रमण्यम यांचा शेवटचा व्हिडीओ, म्हणाले होते - २ दिवसात परत येईल....

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Singer SP Balasubrahmanyam dies Salman Khan and A R Rahman pay condolences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.