SP Bala Subrahmanyam last video after he became positive for corona | एस.पी. बालसुब्रमण्यम यांचा शेवटचा व्हिडीओ, म्हणाले होते - २ दिवसात परत येईल....

एस.पी. बालसुब्रमण्यम यांचा शेवटचा व्हिडीओ, म्हणाले होते - २ दिवसात परत येईल....

देशातील महान गायक  एसपी बाला सुब्रमण्यम यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोना संक्रमित झालेले आपल्या सर्वांचे लाडके गायक बाला सुब्रमण्यम कोरोना व्हायरस विरोधातील लढा हरले. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता.  यात त्यांनी  त्यांना असलेली लक्षणे सांगितली होती. इतकेच नाही तर असेही म्हणाले होते की, त्यांना फार हलकी लक्षणे आहे. मी दोन दिवसात हॉस्पिटलमधून परत येईन.

ते म्हणाले होते की, '२-३ दिवसांपासून मला जरा त्रास होतो. सर्दी ताप येत जात आहे. त्याशिवाय काहीच समस्या नाही. तरी सुद्धा मी याकडे दुर्लक्ष केलं नाही. म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आला आणि टेस्ट केली. मला कोरोना झालाय. डॉक्टरांनी मला औषधे देऊन सांगितले की, तुम्ही घरी थांबून ठीक होऊ शकता. पण मला असं करायचं नव्हतं. परिवारातील लोकांसोबत असं करणं मला योग्य वाटलं नाही. ते लोक फार चिंतेत आहेत आणि ते मला एकटं सोडणार नाहीत. त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये भरती झालो. इथे चांगले डॉक्टर्स आणि मित्र आहेत. माझी तब्येत ठीक आहे. कुणीही चिंता करू नका. मला केवळ सर्दी आहे. ताप उतरला आहे. २ दिवसात मला डिस्चार्ज मिळेल आणि मी घरी जाणार. अनेक लोक मला फोन करत आहेत. मी सर्वांना उत्तर देऊ शकत नाही. मी इथे आराम करायला आलोय'.

एसपी बाला सुब्रमण्यम यांचा मुलगा एसपी चरण याने वडिलांच्या हेल्थबाबत वेळोवेळी माहिती दिली होती. मधेच त्यांची हालत जास्त बिघडली होती. नंतर तब्येत बरी झाली होती. गुरूवारी सायंकाळी हॉस्पिटलने स्टेटमेंट जारी केलं की, त्यांची तब्येत पुन्हा गंभीर झाली आहे. शुक्रवारी दुपारी १.०४ मिनिटांनी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.

‘आवाजाचा जादूगार’ हरपला! एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: SP Bala Subrahmanyam last video after he became positive for corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.