ठळक मुद्देनेहाने तिच्या करियरची सुरुवात ‘इंडियन आयडल’मधून केली.


कधी ‘इंडियन आयडल’ची स्पर्धक राहिलेली नेहा कक्कर आज बॉलिवूडची टॉप मोस्ट सिंगर आहे. बॅक टू बॅक अनेक हिट गाणी गाणाºया नेहाचे लाखो फॅन्स आहेत. साहजिकच चाहत्यांना नेहाच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा आहे. नेहा चित्रपटात कधी दिसणार? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर खुद्द नेहाने त्याचे उत्तर दिलेय.
होय, एका ताज्या मुलाखतीत नेहाने हा खुलासा केला. ती म्हणाली,‘चित्रपट हिट होईल, अशी पूर्ण खात्री झाल्यावरच मी तो साईन करेल. कारण आत्तापर्यंत ज्या कुण्या गायकांनी चित्रपट केलेत, त्यांना फार यश मिळाले नाही. मी असे काही केले तर आधी तो चित्रपट हिट होईल, याची खात्री करून घेईल. केवळ मोठ्या पडद्यावर हिरोईन म्हणून मिरवायचे, म्हणून मी कुठलाही सिनेमा साईन करणार नाही.’

याचा अर्थ स्पष्ट आहे, नेहाला एका योग्य प्रोजेक्टची प्रतीक्षा आहे. तेव्हाच ती सिल्व्हर स्क्रिनवर दिसेल. आता असा प्रोजेक्ट नेहाला कधी मिळेल, कसा मिळेल, हे आम्हाला माहित नाही. पण हो, बॉलिवूडमध्ये काम करण्यास नेहा उत्सूक आहे, हे मात्र यावरून स्पष्ट दिसतेय.

बॉलिवूडच्या अनेक सुप्रसिद्ध गायकांनी याआधी चित्रपटात काम केलेय. यात सोनू निगम, शान, मीका सिंग, हिमेश रेशमिया अशी अनेक नावे आहेत.


नेहाने तिच्या करियरची सुरुवात ‘इंडियन आयडल’मधून केली. या कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून झळकली होती. दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात जन्मलेली नेहा आधी देवीच्या जागरणामध्ये भजन गायची. यासाठी तिला केवळ 500 रुपये मिळायचे. पण आज तिने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची   गाणी प्रचंड गाजलीत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: singer neha kakkar reveals when she will enter in bollywood films-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.