Singer neha kakkar photo with rohanpreet singh surfaces online is it from their roka ceremony | नेहा कक्करने रोहनप्रीतसोबत गुपचुप उरकली रोका सेरेमनी? फोटो झाले व्हायरल

नेहा कक्करने रोहनप्रीतसोबत गुपचुप उरकली रोका सेरेमनी? फोटो झाले व्हायरल

बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर लग्नाच्या चर्चा सध्या जोरदार आहे. नेहा पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंगसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात नेहा किंवा रोहनने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जगरणच्या रिपोर्टनुसार दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हायरल झालेला फोटो बघून नेहाचा रोका झाला असा अंदाज तिचे फॅन्स लावतायेत. नेहा पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग सोबत 24 ऑक्टोबरला लग्न करणार आहे. नेहा व रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत.

या फोटोत नेहा आणि रोहनप्रीत एका सोफ्यावर बसलेले दिसतायेत. नेहाच्या हातात बॅग आहे आणि त्यात काही गिफ्ट्स दिसतायेत. फोटोत नेहा आणि रोहनप्रीत यांनी एकमेकांचा हात पकडलेला दिसतोय. हा फोटो पाहून दोघांच्या साखरपुडा झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर आणखी रंगल्या आहेत. 

कोण आहे रोहनप्रीत सिंग?
‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. 

सोशल मीडिया पोस्टची चर्चा 
‘आजा चल लॉकडाऊन विच व्याह कराइए कट होन खरचे,’ या गाण्यात नेहा व रोहनप्रीत एकत्र दिसले होते. नेहाने अलीकडे तिच्या इन्स्टास्टोरीवर या पंजाबी गाण्याचे बोल पोस्ट केले होते. यानंतर रोहनप्रीतनेही नेहासोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात बॅकग्राऊंडमध्ये ‘डायमंड द छल्ला’ हे गाणे वाजत होते. व्हिडीओत रोहन नेहाच्या बोटात अंगठी घालताना या व्हिडीओत दिसला होता.नेहा सध्या एका सिंगिंग रियालिटी शोची जज आहे. शिवाय तिने बॉलीवुमध्ये गायिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नेहा कक्करच्या लग्नाच्या चर्चांवर एक्स-बॉयफ्रेंड हिमांश कोहलीने दिली प्रतिक्रिया,म्हणाला...

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Singer neha kakkar photo with rohanpreet singh surfaces online is it from their roka ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.