Ex-boyfriend Himanshu Kohli reacts to Neha Kakkar's marriage rumors, says- I know .... | नेहा कक्करच्या लग्नाच्या चर्चांवर एक्स-बॉयफ्रेंड हिमांश कोहलीने दिली प्रतिक्रिया,म्हणाला...

नेहा कक्करच्या लग्नाच्या चर्चांवर एक्स-बॉयफ्रेंड हिमांश कोहलीने दिली प्रतिक्रिया,म्हणाला...

सध्या नेहा कक्करच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. नेहा पंजाबी गायक रोहनप्रीत सिंग सोबत 24 ऑक्टोबरला लग्न करणार आहे. ‘इंडियाज् राईझिंग स्टार 2’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय ‘मुझसे शादी करोगे’ या वेडिंग रिअ‍ॅलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. याच रोहनप्रीतसोबत नेहा लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

दिल्लीत हा विवाह सोहळा होणार असल्याचे कळते. यासंदर्भात नेहाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेहाच्या जवळचे मित्र नेहाच्या लग्नाची चर्चा अफवा असल्याची सांगतायेत. याच दरम्यान नेहाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता हिमांश कोहलीची यावर प्रतिक्रिया आली आहे. 

नेहासोबतच्या रिलेशनशीपवर बोलला हिमांश
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना हिमांश कोहलीला प्रश्न विचारण्यात आला तुला या नेहा आणि रोहनप्रीतच्या लव्हस्टोरीबाबत काही माहिती आहे का? यावर तो म्हणाला मला याबाबत काहीच माहिती नाही. हिमांश कोहली पुढे म्हणाला, 'मला माहित नाही की तिची प्रत्येक पोस्ट माझ्याशी का जोडली जाते, मात्र हे नीट माहिती असते तिचा इशारा माझ्याकडे नसतो. त्या पोस्टना चुकीच्या दृष्टीकोनातून पाहिल्या गेले आणि गोष्टी पसरविण्यात आल्या. अनेकवेळा दोन लोकांना एकत्र राहिल्यानंतर लक्षात येत की आपलं विचार जुळत नाहीत, असे होते आणि हेच झाले होते.' नेहा आणि हिमांशचे 1-2 वर्षा आधी ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर नेहाने सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहिली होती. 
 

या महिन्याच्या अखेरिस लग्नबंधनात अडकणार नेहा कक्कर? कोण आहे तिचा भावी पती?

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ex-boyfriend Himanshu Kohli reacts to Neha Kakkar's marriage rumors, says- I know ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.