ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी नेहा ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. तिचे आणि अभिनेता हिमांश कोहली यांचे ब्रेकअप कधी नव्हे इतके गाजले होते.

बॉलिवूड सिंगर नेहा कक्करने एक व्हिडीओ शेअर केला आहे. नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. आता या व्हिडीओत असे काय खास आहे, असे तुम्ही विचाराल तर नेहाचे मम्मी पापा. होय, नेहाचे मम्मी-पापा यांच्यातील गोड रूसवे-फुगवे यात पाहायला मिळत आहेत. नेहाची मम्मी तिच्या पापाची माफी मागताना यात दिसत आहे.
Meet The Cutest Parents Ever!! Mr and Mrs Kakkar doing, असे हा व्हिडीओ शेअर करताना नेहाने लिहिले आहे. हा व्हिडीओ लंडनमधील आहे. लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत असतानास्र नेहाच्या मॉम-डॅडने लेकीचे ‘सॉरी सॉन्ग’ रिक्रिएट केले आहे. यातील दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी आहे.


नेहा व मनिंदर बुत्तर या दोघांनी गायलेले ‘सॉरी सॉन्ग’ तुफान लोकप्रिय झाले. मनिंदर बुत्तरने हे गाणे कम्पोज केले होते.  हे ‘सॉरी सॉन्ग’ एका नव्या रूपात पाहायची इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडीओ पाहायलाच हवा.


काही दिवसांपूर्वी नेहा ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती. तिचे आणि अभिनेता हिमांश कोहली यांचे ब्रेकअप कधी नव्हे इतके गाजले होते. या ब्रेकअपनंतर नेहा सैरभैर झाली होती. साहजिकच  या दु:खातून सावरायला तिला बराच वेळ लागला. पण आता ती यातून पूर्णपणे बाहेर पडली आहे. अलीकडे एका मुलाखतीत, हिमांशसोबत ब्रेकअपमागच्या कारणांचा खुलासाही तिने केला होती.  जो माझ्या योग्यतेचाच नव्हता, त्याच्यावर मी माझा अमूल्य वेळ आणि ऊर्जा खर्च केली, असे सांगत हिमांशसोबतचे ब्रेकअप ही माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात चांगली गोष्ट असल्याचेही ती म्हणाली होती. गायन क्षेत्राशिवाय नेहाने अनेक रिएलिटी शोचे परीक्षण केले आहे. गतवर्षी ती ‘इंडियन आयडॉल’ची परीक्षक होती.

Web Title: singer neha kakkar parents doing sorry song video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.