ठळक मुद्देयात बादशाहच्या अपोझिट सोनाक्षी सिन्हा दिसणार आहेहा सिनेमा पंजाबी संगीतकाराच्या आयुष्यावर आधारित आहे

रॅम्पर बादशाहने  आतापर्यंत बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. लवकरच तो सिनेमामध्ये हिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक शिल्पी दासगुप्ताच्या सिनेमामधून बादशाह बॉलिवूडमध्ये डेब्यू करायला सज्ज झाला आहे. यात बादशाहच्या अपोझिट सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. हा सिनेमा पंजाबी संगीतकाराच्या आयुष्यावर आधारित आहे.  


आपल्या डेब्यूबाबत बादशाह म्हणाला, ''मी खूप नर्वस आहे, याआधी मी निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि आता अभिनयाच्या क्षेत्रात करतोय. या सिनेमाची कथा खूपच वेगळी आहे. सोनाक्षी सिन्हा माझी खूप चांगली मैत्रिण आहे तिच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.'' 


 सिनेमाची शूटिंग पंजाबमध्ये सुरु करण्यात आली आहे लवकरच बादशाह पंजाबसाठी रवाना होणार आहे. सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. 


भूषण कुमार म्हणाले, ''जेव्हा मी या सिनेमाची कथा वाचली तेव्हा सर्वात पहिल्यांदा माझ्या डोक्यात बादशाहचे नाव आले. तो या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. त्याला या भूमिकेसाठी तयार करायला मला थोडावेळ लागला. पण मी खूश आहे की तो ही भूमिका साकारायला अखेर तायर झाला.'' 2006मध्ये बादशाहने आपल्या करिअरची सुरुवात केली त्याला खरी ओळख मिळाली ती 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या गाण्यामुळे. बादशाहला आज किंग ऑफ रॅप म्हणून ओळखले जाते. बादशाहचे फॅन त्याची नवी इनिंग पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Singer badshah going to make his acting debut in bhushan kumar film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.