अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याचा आगामी चित्रपट 'जबरिया जोडी'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हे दोघे सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतेच या दोघांनी एका टॉक शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी सिद्धार्थने कियारा आडवाणी व तारा सुतारियासोबतच्या लिंकअप वृत्तावर चुप्पी तोडली आहे. 


सिद्धार्थ मल्होत्रानं सांगितलं की, 'हे सर्व जबरिया वृत्त आहे. आमच्या चित्रपटाशिवाय दुसरी कोणतीच जबरिया गोष्ट चांगली नाही. '

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ व परिणीतीने 'जबरिया जोडी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी सिद्धार्थने त्याच्या शालेय जीवनातील काही किस्से सांगितले. सिद्धार्थने सांगितलं की, एका मुलीमुळे तो नववी इयत्तामध्ये नापास झाला होता. त्या मुलीमुळे त्याचे अभ्यासावरील लक्ष उडाले होते. मात्र या टर्निंग पॉइंटमुळे त्याच्या आयुष्यात खूप बदल झाल्याचं तो सांगतो.

तो म्हणाला की, मी शाळेत नवीन गोष्ट शिकलो. त्यानंतर मी दहावी व अकरावीत चांगले गुण मिळविले होते.


'जबरिया जोडी' २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. जबरिया जोडीची कथा बिहारमधील जबरदस्तीने लावल्या जाणाऱ्या विवाहावर आधारीत आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बिहारी ठगाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात परिणीती व सिद्धार्थ शिवाय अपारशक्ती खुराणा व संजय मिश्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: sidharth malhotra talks about link up rumours with tara sutaria and kiara advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.