शेहशाह: 'त्या' सीनमध्ये सिद्धार्थने जाणूनबुजून केलं कियाराला किस; सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 06:20 PM2021-09-22T18:20:06+5:302021-09-22T18:21:31+5:30

Shershaah: या चित्रपटानंतर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिलेशनशीपची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

sidharth malhotra on kissing scene in film shershaah with kiara advani | शेहशाह: 'त्या' सीनमध्ये सिद्धार्थने जाणूनबुजून केलं कियाराला किस; सत्य आलं समोर

शेहशाह: 'त्या' सीनमध्ये सिद्धार्थने जाणूनबुजून केलं कियाराला किस; सत्य आलं समोर

Next
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ आणि कियाराने 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

कारगिल युद्धातील रिअल हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित शेहशाह हा चित्रपट अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकला असून कियारा आडवाणीने विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीची म्हणजेच डिंपल चीमा यांची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिलेशनशीपची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. त्यातच 'शेहशाह'मधील सिद्धार्थ आणि कियाराचा एक किसिंग सीन व्हायरल झाला आहे. यात सिद्धार्थने जाणूनबुजून कियाराला किस केलं असं म्हटलं जात आहे. मात्र,त्यामागचं सत्य आता सिद्धार्थने समोर आणलं आहे.

काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ आणि कियाराने 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी सिद्धार्थ चित्रपटातील अनुभव शेअर करत असताना कपिलने त्याला  चित्रपटातील किसिंग सीनबद्दल विचारलं. "तो सीन खरंच चित्रपटाच्या कथेत लिहिला होता की ती तुझी क्रिएटिव्हिटी होती?", असा प्रश्न कपिलने सिद्धार्थला विचारला. त्यावर सिद्धार्थने हसून या प्रश्नाचं उत्तर दिलं.

"नाही. तसं अजिबात नाही. जे चित्रपटाच्या कथेसाठी गरजेचं होतं आणि जे आमच्या भूमिकांसाठी आवश्यक होतं तेच आम्ही केलं. मुळात इतरांनी केलेल्या बळजबरीमुळे आम्ही तो सीन कसाबसा केला होता", असं उत्तर सिद्धार्थने दिलं.

Video : असं असतं ऐश्वर्या नारकरचं फोटोशूट; पाहा 'बिहाइंड द सीन'

दरम्यान, शेहशाह चित्रपटापासून कियारा आणि सिद्धार्थच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर अनेकदा या दोघांना एकत्रही स्पॉट करण्यात आलं आहे.
 

Web Title: sidharth malhotra on kissing scene in film shershaah with kiara advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app