सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुखतारा सुतारियाच्या अभिनयानं सजलेला चित्रपट मरजावांचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. दमदार अ‍ॅक्शनचा तडका असलेला या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरीनं केलं आहे. रोमान्स, अ‍ॅक्शन असलेला चित्रपट मरजदावां ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ, रितेश, तारा यांच्याव्यतिरिक्त रकुल प्रीत सिंगदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.


मरजावां या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ मल्होत्रातारा सुतारिया ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच रितेश बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.

चित्रपटातील डायलॉग खूप चांगले आहेत. ट्रेलरची सुरूवात सिद्धार्थच्या अ‍ॅक्शन सीनने होतो. यात तो रावडी अंदाजात दिसतो आहे. तर स्टुडंट ऑफ द ईयर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या तारा सुतारियाचा ग्लॅमरस अंदाज ट्रेलरमध्ये पहायला मिळतो आहे. या चित्रपटात तारा मुकी मुलीची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख यांनी यापूर्वी रोमँटिक स्टोरी एक व्हिलनमध्ये एकत्र काम केलं आहे. मरजावां चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रितेशची एन्ट्री एक व्हिलनमधील गाणं तेरी गलियाच्या म्युझिकनं होतं. सिद्धार्थ व ताराच्या लव्हस्टोरीमध्ये युटर्न रितेशच्या एन्ट्रीमुळे होतो.


रितेश देशमुख तारा सुतारिया व सिद्धार्थला जीवे मारण्यासाठी हात धुवून मागे लागतो. मात्र ट्रेलरच्या शेवटी ट्विस्ट येतो तो म्हणजे स्वतः सिद्धार्थच ताराला गोळी मारतो. त्यामुळे सस्पेन्स क्रिएट होतो. आता चित्रपट पाहिल्यावरच हे रहस्य उलगडेल. 


मरजावांचे डायलॉग दमदार आहेत. चित्रपटात रोमांस, दमदार अ‍ॅक्शनचा तडका पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

Web Title: Siddharth Malhotra, Ritesh Deshmukh and Tara Sutariya's Movie Marjaavaan Trailer is out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.