Photo: सिद्धांत चतुर्वेदीच्या घरात झालं 'तिचं' स्वागत; फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 03:38 PM2022-01-19T15:38:09+5:302022-01-19T15:38:51+5:30

Siddhant chaturvedi: सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या सिद्धांतने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या कुटुंबात सहभागी झालेल्या एका पाहुण्याची ओळख करुन दिली आहे. 

siddhant chaturvedi buys new harley davidson bike know the prize | Photo: सिद्धांत चतुर्वेदीच्या घरात झालं 'तिचं' स्वागत; फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

Photo: सिद्धांत चतुर्वेदीच्या घरात झालं 'तिचं' स्वागत; फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट

Next

'गली बॉय' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी (siddhant chaturvedi). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर आज सिद्धांतने कलाविश्वात त्याची हक्काची जागा मिळवली आहे. त्यामुळे कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यांच्या यादीत त्याचं आवर्जुन नाव घेतलं जातं. अलिकडेच सिद्धांतचा 'बंटी और बबली 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. मात्र, सिद्धांतने प्रेक्षकांची वाहवाह नक्कीच मिळवली.त्यामुळे हा अभिनेता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले. यामध्येच त्याच्या घरी आता एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणाऱ्या सिद्धांतने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या कुटुंबात सहभागी झालेल्या एका पाहुण्याची ओळख करुन दिली आहे.  परंतु, हा पाहुणा कोणती व्यक्ती नसून त्याची नवीन बाईक आहे.

सिद्धांतने एक ब्रँड न्यू स्वँकी हार्ले डेव्हिडसन बाईक खरेदी केली आहे. या बाईकसोबत त्याने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. तसंच त्याचा आनंद कॅप्शनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ''किक मारुन कित्येक चप्पल तुटल्या असतील. आज बूट्समध्ये आणि बटण बोटांखाली आहे'', असं कॅप्शन सिद्धांतने या पोस्टला दिलं आहे.

दरम्यान, सिद्धांतने हार्ले डेव्हिडसन स्पोर्टस्टर आर बाईक खरेदी केली आहे. या बाईकची किंमत जवळपास १७ लाख २४ हजार ४१५ रुपये इतकी आहे. सध्या सिद्धांतवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. सिद्धांत लवकरच गहराइयां या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: siddhant chaturvedi buys new harley davidson bike know the prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app