ठळक मुद्देकमल हासनची लाडकी मुलगी श्रुती हासनने प्लास्टिक सर्जरीबाबत कबुली सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

बॉलिवूडमध्ये काम करत असताना आपण इतर अभिनेत्रींपेक्षा चांगले दिसावे असे प्रत्येक अभिनेत्रीला वाटत असते. त्यामुळे अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करण्याचा मार्ग स्वीकारतात. काहींची प्लास्टिक सर्जरी योग्यप्रकारे होते तर काहींची प्लास्टिक सर्जरी चुकल्यामुळे त्या पहिल्यापेक्षा देखील अतिशय वाईट दिसू लागतात. मी चांगली दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली होती अशी कबुली देणारी अभिनेत्री क्वचितच सापडते. पण आता कमल हासनची लाडकी मुलगी श्रुती हासनने प्लास्टिक सर्जरीबाबत कबुली सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

प्लास्टिक सर्जरीवरून श्रुती हासनला अनेकवेळा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. पण तिने त्यावर एवढ्या वर्षांत गप्प राहाणेच पसंत केले होते. पण आता तिने बॉडी शेमिंग करणाऱ्यांवर एक लांबलचक पोस्ट लिहून सणसणीत उत्तर दिले आहे. शिवाय हो, मी प्लास्टिक सर्जरी केली आणि हे सांगताना मला कुठलीही लाज वाटत नाही, असेही श्रुतीने म्हटले आहे.

तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कधी लोकांना मी खूप लठ्ठ दिसते आणि कधी खूप सडपातळ असल्याचे लोक म्हणतात. अशा लोकांच्या म्हणण्यानुसार मी वागू शकत नाही. माझ्या या मतावर अनेक महिला सहमत असतील, असा मला विश्वास आहे. शारीरिक बदल सोपा नाही. पण हो, या बदलावर बोलणे मात्र माझ्यासाठी सोपे आहे. हे माझे आयुष्य आहे, हा माझा चेहरा आहे आणि हो, मी प्लास्टिक सर्जरी केलीय. हे सांगताना मला अजिबात लाज वाटत नाही. मी प्लास्टिक सर्जरीला पाठिंबा देतेय किंवा मी याच्याविरोधात आहे, असे काहीही नाही. ही आयुष्य जगण्याची माझी पद्धत आहे. शरीराचे आणि मनाचे बदल स्वीकारून आपण स्वत:वर आणि इतरांवर उपकार करू शकता. प्रेम वाटा आणि आनंदाने जगा...

2008 मध्ये ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटातून श्रुतीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर 2011 मध्ये तेलगू इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. हा सिनेमाही आपटला. पण यानंतर तिने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shruti Haasan confesses about Plastic Surgery PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.