Sur Jyotsna Awards : श्रेया घोषालच्या आवाजाने नागपूरकर मंत्रमुग्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 08:08 PM2019-03-23T20:08:39+5:302019-03-23T20:09:48+5:30

सूर ज्योत्स्ना पुरस्कार-२०१९ च्या निमित्ताने नागपूरकरांना श्रेयाच्या गाण्याची मेजवानी मिळाली... यावेळी तिने जीव रंगला हे मराठी गाणे देखील गायले

shreya ghoshal in Sur Jyotsna Awards | Sur Jyotsna Awards : श्रेया घोषालच्या आवाजाने नागपूरकर मंत्रमुग्ध

Sur Jyotsna Awards : श्रेया घोषालच्या आवाजाने नागपूरकर मंत्रमुग्ध

googlenewsNext
ठळक मुद्देलोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे वितरण दरवर्षी करण्यात येते.

कहते है ये दीवानी... म्हणत श्रेया घोषाल मंचावर आली आणि माहौल मस्तानी झाले... नागपूर में आ के बहोत ही अच्छा लग रहा है... असे म्हणत श्रेयाने नागपुरकरांना साद घातली... चंदेरी ड्रेस घालून श्रेया स्टेजवर आली आणि स्वरांच्या या मस्तानीने नागपुरकरांना वेड लावले. निमित्त होते सूर ज्योत्स्ना संगीत पुरस्काराचे...’ या पुरस्कार सोहळ्यात तिचे लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. 

सूर ज्योत्स्ना पुरस्कार-२०१९ च्या निमित्ताने नागपूरकरांना श्रेयाच्या गाण्याची मेजवानी मिळाली... यावेळी तिने जीव रंगला हे मराठी गाणे देखील गायले आणि तिच्या करियरमध्ये संगीतकार अजय-अतुल यांचे मोठे योगदान असल्याचे तिने यावेळी आवर्जून सांगितले. 

लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे वितरण दरवर्षी करण्यात येते. या भव्य समारंभात आपल्या सुमधूर आवाजाने महाराष्ट्रावर जादू करणारी ‘सा रे ग म प’ फेम आर्या आंबेकर व महान शास्त्रीय संगीत कलावंत तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी यांना ‘सूर ज्योत्स्ना अवॉर्ड-२०१९’ने सन्मानित करण्यात आले. 

‘सा.रे.ग.म.प.’मध्ये स्पर्धक म्हणून श्रेया गायला आली आणि परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या संगीतकार कल्याणजी यांनाही तिच्या स्वरांची भुरळ पडली. ती स्पर्धेची विजेती ठरलीच, पण तिचे स्वर स्पर्धेपुरते मर्यादित नव्हते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘देवदास’मधून तिला पहिली संधी  दिली आणि या मखमली स्वरांनी लोकांवर जादू केली. ‘बैरी पिया..., डोला रे..., मोरे पिया..., सिलसिला ये चाहत का...’ या गीतांची मोहिनी चढली. मग श्रेयाने कधी मागे वळून पाहिलेच नाही. ती कधी हळुवार होती, तर कधी खट्याळ... कधी रोमान्स तर कधी विरह. ‘जादू है नशा है..., अगर तुम मिल जाओ..., छन छन मन गाये क्यों..., सुना सुना लम्हा लम्हा..., शिकदूम..., पिया बोले पिहू बोले..., धीरे जलना..., पल पल हर पल..., होठ रसिले तेरे..., ये ईश्क हाये जन्नत दिखाये..., मेरे ढोलना सुन..., बरसो रे मेघा मेघा..., चिकनी चमेली..., नगाडे संग ढोल बाजे..., तेरी ओर तेरी ओर..., तुझमे रब दिखता है..., मै तैनू समझावा की...’, बाजीराव मस्तानीतील ‘पिंगा ग पोरी पिंगा...’, पद्मावतचे ‘घुमर..’ अशा अनेक गीतांचे स्वरसौंदर्य आजवर रसिकांवर बरसले आहेत. 

संगीताला भाषेचे बंधन नसते, तसे श्रेयाच्या स्वरांनाही राहिले नाही. मूळची बंगाली पण मराठी, तामीळ, कन्नड, मल्याळम, आसामी अशा विविध भाषांमधून तिचे स्वर निनादले. केवळ मराठीतच तिने १०० च्या आसपास गाणी गायली आहेत. आठवा ते ‘जोगवा’ चित्रपटातलं, ‘मन रानात गेलंजी..., जीव रंगला...’, नीळकंठ मास्तरचे ‘अधीर मन झाले...’, पक पक पकाक, लई भारी, डबल सीट, देवा अशा अनेक चित्रपटांमधून तिचा आवाज गुंजला आणि रसिकांना भावला.

Web Title: shreya ghoshal in Sur Jyotsna Awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.