Shraddha Kapoor rocks social media trends | म्हणून सोशल मीडियावरही ShraddhaKapoor चा बोलबाला

म्हणून सोशल मीडियावरही ShraddhaKapoor चा बोलबाला

बॉलीवूडमध्ये सध्या ‘स्त्री’ सिनेमाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा बिजनेस करणा-या ह्या सिनेमामूळे श्रध्दा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनूसार, ‘स्त्री’ श्रध्दा कपूर डिजीटल विश्वात आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

गेले काही दिवस निक-प्रियंका जोडीची डिजीटल विश्वात एवढी चर्चा होती की, प्रियंकाच गेले कित्येक दिवस इंटरनेटवर सर्वत्र दिसत होती. पण ‘स्त्री’ चित्रपटातल्या दमदार परफॉर्मन्समूळे श्रध्दाने प्रियंकालाही लोकप्रियतेत मागे टाकले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट जाहीर केली आहे. डिजीटल विश्वात सध्या श्रध्दा आणि प्रियंका चोप्राशिवाय 'सुई धागा' चित्रपटामूळे अनुष्का शर्मा आणि आपल्या वेबसीरिजमूळे राधिका आपटेचा चाहतावर्ग खूप आहे. तसेच मणिकर्णिका सिनेमामूळे कंगना रनौतसूध्दा चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.

 

मात्र नंबर वन स्थानी पोहोचलेल्या श्रध्दाने 100 गुणांसह डिजीटल विश्वात ह्या सर्व अभिनेत्रींना मागे टाकले आहे. डिजीटल लोकप्रियतेत श्रध्दानंतर प्रियंका चोप्रा 89 गुणांसह दूस-या स्थानावर, अनुष्का शर्मा 36 गुणांसह तिस-या जागी, राधिका आपटे 26 गुणांसह चौथ्या पदावर तर कंगना रनौत 23 गुणांसह पांचव्या क्रमांकावर आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “स्त्री चित्रपटाच्या लोकप्रियतेमूळे आणि सिनेमाला प्रेक्षकांच्या मिळत असलेल्या प्रतिसादामूळे श्रध्दा कपूरच्या लोकप्रियतेत बरीच वाढ झालेली दिसून आली आहे. सिनेमा पाहिलेल्या  रसिकांची प्रतिक्रिया आणि त्याविषयीच्या होणा-या सोशल मीडिया पोस्टमूळे श्रध्दा तिथेही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेच. शिवाय श्रध्दा सध्या ‘बत्ती गूल…’ ह्या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे. आणि त्याविषयीही डिजीटलमाध्यमामध्ये लेख आणि पोस्ट होत आहेत. म्हणूनच डिजीटल आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर श्रद्धाचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shraddha Kapoor rocks social media trends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.