The shooting of 'Tiger 3' did not stop even after Katrina Kaif was infected with corona, this is the reason behind it. | कतरिना कैफला कोरोनाची लागण झाल्यानंतरही थांबले नाही 'टाइगर ३'चं शूटिंग, हे आहे यामागचे कारण

कतरिना कैफला कोरोनाची लागण झाल्यानंतरही थांबले नाही 'टाइगर ३'चं शूटिंग, हे आहे यामागचे कारण

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण झाली आहे. तिने याबद्दल सांगितले की तिची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ती घरातच क्वारंटाइन झाली आहे. कतरिना कैफ सध्या तिचा आगामी चित्रपट टाइगर ३चे शूटिंग करत होती. आता तिला कोरोनाची लागण झाली आहे म्हटल्यावर त्याचा शूटिंगवरही परिणाम होऊ शकतो. मात्र टाइगर २च्या शूटिंगसंदर्भात वेगळीच माहिती समोर आली आहे.


पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, टाइगर ३च्या शूटिंगमध्ये काहीच बदल झालेला नाही. सर्व काही ठरवलेल्या योजनेनुसार होणार आहे. सध्या सलमान खान मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहे आणि एप्रिलच्या शेवटी कतरिना शूटिंग करणार आहे. वेबसाइटशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, टाइगर ३चे कतरिना कैफचे शूटिंग तीन आठवड्यानंतर असणार आहे. असाच प्लान आधी केला गेला होता. हाच शूटिंगचा मूळ प्लान होता. त्यामुळे टाइगर ३च्या शूटिंगला उशीर होणार नाही. सध्या सलमान खान आपल्या वाटेचे शूटिंग खत्म करत आहे. 


कतरिना कैफच्या आधी अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, विकी कौशल, आलिया भट, आमिर खान असे बरेच बॉलिवूडचे कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. ६ एप्रिल रोजी कतरिनाने इंस्टाग्राम स्टोरीवर तिला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते.

तिने या पोस्टमध्ये लिहिले होते की, माझी कोव्हिड १९ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. लगेच स्वतःला आइसोलेट केले आहे आणि घरीच क्वारंटाइन झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमांचे पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती आहे की त्यांनी स्वतःची टेस्ट नक्की करा. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभारी आहे. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The shooting of 'Tiger 3' did not stop even after Katrina Kaif was infected with corona, this is the reason behind it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.