The shooting of 'Tandav' took place in Saif Ali Khan's Pataudi Palace, the actor told about this experience | सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये पार पडलं 'तांडव'चं शूटिंग, अभिनेत्यानं सांगितलं या अनुभवाबद्दल

सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसमध्ये पार पडलं 'तांडव'चं शूटिंग, अभिनेत्यानं सांगितलं या अनुभवाबद्दल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान लवकरच बहुप्रतिक्षित अ‍ॅमेझॉन ओरिजिनल सीरिज ‘तांडव’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसिरिज एक पॉलिटिकल ड्रामा आहे. विशेष बाब म्हणजे तांडव चित्रपटाचे शूटिंग सैफ अली खानच्या पटौडी पॅलेसमध्ये पार पडले आहे. या शूटिंगच्या अनुभवाबद्दल नुकतेच सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले. 


सैफ अली खान म्हणाला की, पतौडी पॅलेसमध्‍ये शोच्‍या अनेक सीक्‍वन्‍सेसचे शूटिंग करण्‍यात आले आहे. मी जगात इतरत्रपेक्षा पॅलेसमध्‍ये अधिक वेळ व्‍यतित करतो. ते माझे घर असल्‍यामुळे मला शूटिंग करताना खूपच आरामदायी वाटले. मी एखाद्या प्रकल्‍पामध्‍ये काम करत असेन तर माझा पॅलेस शूटिंगला देण्‍याबाबत काहीच हरकत नाही. वर्षातील ३४० दिवस पॅलेसचा काहीच उपयोग होत नाही. मला पॅलेसकडे व्‍यावसायिक मालमत्ता म्‍हणून पाहायला आवडते आणि भाड्याने देण्‍याचा आनंद होतो. पण टीमने पॅलेसमध्‍ये प्रवेश केल्‍यानंतर काहीसे नर्व्हस वाटते. तेथे राहण्‍यासोबत शूटिंग करण्‍याचा आनंददायी अनुभव राहिला. डिंपलजी आमच्‍यासोबत तेथे राहिल्‍या आहेत. शोचे उर्वरित शूटिंग दिल्‍लीमधील इम्‍पेरिअल हॉटेलमध्‍ये करण्‍यात आले. मी केलेले हे सर्वात आरामदायी शूटिंग होते.


या सीरिजमधील भूमिकेबद्दल सैफ अली खानने सांगितले की, माझ्या मते, विशिष्‍ट भूमिकेसाठी केल्‍या जाणाऱ्या तयारीवर विविध प्रभाव असतात. माझी भूमिका एका राजकारणीची आहे, जो अधिक प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी बोलतो. म्‍हणूनच मला समरच्‍या भूमिकेसाठी अनेक संस्‍कृत कृत हिंदी भाषणांची तयारी करावी लागली. मजेशीर बाब म्‍हणजे मला संस्‍कृत बोलायला आवडते. कधी-कधी शूटिंगचा खूपच त्रास होतो, तर कधी-कधी शूटिंगमधून काहीसा मोकळा वेळ मिळतो. या शोमध्‍ये मला दररोज जवळपास ४ संस्‍कृत भाषण बोलायचे होते. म्‍हणून मला अनेक अवघड वाक्‍ये शिकावी लागली.

सुनील ग्रोव्हर 'तांडव' वेबसीरिजमध्ये दिसणार वेगळ्या भूमिकेत, जाणून घ्या याबद्दल

डिनो मोरियाने 'तांडव'मधील प्रोफेसरच्या भूमिकेसाठी घेतली ही मेहनत


हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांची निर्मिती असलेला ‘तांडव’ हा शो म्हणजे ९ भागांचे राजकीय नाट्य आहे. ही सीरिज १५ जानेवारीला 
यामध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोवर, तिग्मांशु धुलिया, दिनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तुर, मोहम्मद झिशान अयुब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनुप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागरानी यांच्या भूमिका आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The shooting of 'Tandav' took place in Saif Ali Khan's Pataudi Palace, the actor told about this experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.