ठळक मुद्देस्मायली चित्रपटात काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे, तिच्या मुलीचे फोटो पोस्ट करत असते.

कलयुग या चित्रपटातील अतिशय देखणी अभिनेत्री स्मायली सुरी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. तिच्या सौंदर्याची त्यावेळी चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटातील तिची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली होती. त्यानंतर ती ये मेरा इंडिया या चित्रपटात दिसली होती. या दोन चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली नाही. त्यानंतर तिसरी आँख, क्रूक यांसारख्या काही चित्रपटात ती पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूरच राहिली. मोठ्या पडद्यावर मिळालेल्या अपयशानंतर तिने छोट्या पडद्यावर देखील आपले भाग्य आजमावले होते. ती जोधा अकबर या मालिकेत झळकली होती. तसेच नच बलिये या कार्यक्रमात पती विनीत बंगेरासोबत तिने भाग घेतला होता. 

स्मायली ही एक अभिनेत्री असण्यासोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. तिने अनेक वर्षं नृत्याचे धडे गिरवले आहे. शामक दावरच्या ग्रुपसोबतही तिने काम केले आहे. स्मायली ही दिग्दर्शक मोहित सुरीची बहीण असून कलयुग हा चित्रपट देखील मोहितनेच दिग्दर्शित केला होता. मोहितने दिग्दर्शित केलेल्या जहेर या चित्रपटात तिने साहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका बजावली होती. महेश भट आणि मुकेश भट हे स्मायलीचे काका असून इम्रान हाश्मी, पूजा भट, आलिया भट, पूजा भट, राहुल भट ही तिची चुलत भावंडं आहेत. स्मायली गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असून तिने २०१४ मध्ये विनीत बंगेरासोबत लग्न केले.

स्मायली चित्रपटात काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर तिचे, तिच्या मुलीचे फोटो पोस्ट करत असते. स्मायली अभिनय करत नसली तरी आजही तिने तिच्या नृत्याच्या आवडीला जोपासले आहे. तिचे पोल डान्सचे अनेक व्हिडिओ आपल्याला तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. 

गेल्या अनेक वर्षांत स्मायली खूपच बदलली आहे. कलयुग या चित्रपटाच्यावेळी ती खूपच सडपातळ होती. पण आता तिचे कित्येक किलो वजन वाढलेले असून तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे. 


Web Title: Shocking transformation of 'Kalyug' heroine, see her pics
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.