Shocking! Shooting outside Kangana Ranaut's house, police deployed for security | धक्कादायक! कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेसाठी पोलीस तैनात

धक्कादायक! कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार, सुरक्षेसाठी पोलीस तैनात

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतने बॉलिवूडमधील घराणेशाही व गटबाजीला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे कंगना सतत चर्चेत येत होती. दरम्यान आता कंगना रानौतच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. आपल्याला घाबरवण्यात येत असल्याचा दावा कंगनाने केला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कंगना सध्या तिच्या कुल्लू येथील घरी राहत आहे. तिच्या म्हणण्यानुसार गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमाराला तिच्या घराबाहेर गोळीबार ऐकू आला. आधी तिला ते फटाके असावेत असे वाटले. मात्र, या मोसमात पर्यटक कुलुमध्ये येत नाहीत, त्यामुळे हा परिसर शांत असतो. त्यामुळे कंगनाने तिच्या सुरक्षा रक्षकाला बोलावले. मात्र, त्याला कदाचित गोळीबाराचा आवाज नवीन असेल, म्हणून तो ते ओळखू शकला नाही, असे कंगना म्हणाली.


कंगनासोबत त्यावेळी घरात कुटुंबातील चार सदस्य उपस्थित होते. त्यानंतर कंगनाने पोलिसांना कळवले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कदाचित कुणीतरी वटवाघुळाला मारण्याचा प्रयत्न करत होते. वटवाघुळांमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. त्यामुळे आम्ही स्थानिक शेतकऱ्याला बोलवले. मात्र, त्याने गोळीबार केला नसल्याचे म्हटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे जाणूनबुजून मला घाबरवण्यासाठी केले जात असल्याचा आरोप कंगना रानौतने केला आहे.कंगनाच्या घराच्या आसपास अशा कोणत्याही प्रकारचे पुरावे सापडलेले नाहीत, जे गोळीबार झाल्याची पुष्टी करू शकतील, असे पोलिसांचे म्हणणं आहे. फॉरेन्सिक टीमलाही आसपास कुठेही काडतुस किंवा तत्सम वस्तू आढळलेल्या नाहीत. सध्या तिच्या घराशेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी केली जात असून तिच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! Shooting outside Kangana Ranaut's house, police deployed for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.