Shocking! 26 Year Old Bengali Actress Model Allegedly Raped At Her Kolkata Residence | धक्कादायक! अभिनेत्रीच्याच घरात घुसून तिच्यावर केला बलात्कार, आरोपीने व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची दिली धमकी

धक्कादायक! अभिनेत्रीच्याच घरात घुसून तिच्यावर केला बलात्कार, आरोपीने व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची दिली धमकी

पश्चिम बंगालमधील बिजॉयगढ विभागाच एका 26 वर्षीय अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या अभिनेत्रीवर बलात्कार झाला असून याची तक्रार तिने जादवपूर पोलीस स्थानकात केली आहे. पोलिसांनी या अभिनेत्रीचे मेडिकल चेकअप केले आहे. या अभिनेत्रीने साथ भाई चम्पा यांसारख्या बऱ्याच मालिकेत काम केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 5 जुलैला अभिनेत्रीच्या फ्लॅटवर तिच्या ओळखीचा एक व्यक्ती आर्थिक मदत मागण्यासाठी आला होता. तिला एकटीला घरात पाहून त्याने त्याचा फायदा उचलला आणि तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांना जबाब देताना या अभिनेत्रीने सांगितले की ती तिच्या फ्लॅटवर एकटी राहते.
अभिनेत्रीने सांगितले की, आरोपीने फक्त दुष्कृत्यच केले नाही तर या घटनेचा व्हिडिओदेखील मोबाइलने शूट केला. आरोपीने पीडितेला धमकी दिली की, जर याबद्दल कोणाला सांगितले तर हा व्हिडिओ व्हायरल करेन. तरीदेखील अभिनेत्रीने पोलीस तक्रार केली.
या घटनेबद्दल पोलिसांनी सांगितले की, आरोपी विरोधात कलम 376 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी पेशाने बिझनेसमन आहे आणि अभिनेत्रीच्या परिचयाचा आहे. दोघांमध्ये प्रेम असल्याचेही समोर आले आहे.
अभिनेत्री मूळची पश्चिम बंगालमधील नादिया येथील आहे. ती मॉडेलिंग व अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी कोलकातामध्ये राहते. तिचे आरोपीसोबत आधी चांगले संंबंध होते. पण काही कारणांवरून ते खराब झाले होते. लॉकडाउनमध्ये या आरोपीने फेसबुकवर अभिनेत्रीशी संपर्क साधला आणि भेटण्याची विनंती केली. आधी अभिनेत्रीने नकार दिला पण बिझनेसमध्ये नुकसान झाली आहे आणि आर्थिक मदत मागितली म्हणून तिने त्याला घरी बोलवले होते.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shocking! 26 Year Old Bengali Actress Model Allegedly Raped At Her Kolkata Residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.