Shobhaa De slam celebs who celebrate vacation in maldives during pandemic | उपकार करा आणि फोटो स्वत:जवळ ठेवा! व्हॅकेशनचे बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकल्या शोभा डे

उपकार करा आणि फोटो स्वत:जवळ ठेवा! व्हॅकेशनचे बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या सेलिब्रिटींवर भडकल्या शोभा डे

ठळक मुद्देतुम्हाला ठाऊक आहेच की, सध्या बॉलिवूडचे अनेक स्टार्स मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. आलिया भट, रणबीर कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी असे सगळेजण मालदीवमध्ये आहेत.

मालदीवमध्ये जाऊन तोकड्या कपड्यांतील स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करणा-या बॉलिवूड सेलिब्रिटींना श्रुती हासनने चांगलेच सुनावले. आता देशातील सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनीही या सेलिब्रिटींना फैलावर घेतले आहे.
शोभा डे (Shobhaa De ) यांनी रोहिणी अय्यर यांनी लिहिलेली एक नोट आपल्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केली आहे.
‘स्वत:चे फोटो शेअर करणे असभ्यपणा आहे. तुम्ही नशीबवान आहात की, या कठीण काळात तुम्हाला ब्रेक मिळतोय. पण सर्वांवर एक उपकार करा, हे खासगी ठेवा,’ असे रोहिणी अय्यर यांची पोस्ट शेअर करत शोभा डे यांनी म्हटले आहे. (Shobhaa De slam celebs who celebrate vacation in maldives during pandemic)

रोहिणी अय्यर यांची पोस्ट...
रोहिणी अय्यर यांनी मालदीव व गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करणा-या सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. त्या लिहितात, ‘तुम्ही सगळे मालदीव व गोव्यात अलिशान ठिकाणांवर सुट्टी घालवत आहात. पण लक्षात ठेवा, ही सुट्टी तुमच्यासाठी आहे. भयंकर महामारीचा काळ आहे. अशास्थिीत इतके असंवेदनशील, मूर्ख बनू नका आणि स्वत:च्या प्रिव्हिलेज्ड लाईफचे फोटो शेअर करू नका. असे फोटो शेअर करून तुम्ही अक्कलशून्यच नाही तर पूर्णपणे आंधळे आणि बहिरे दिसत आहात. ही वेळ इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्याची नाही तर मदत करण्याची आहे. काही करू शकत नसाल तर किमान  घरी राहा किंवा हॉलिडे होममध्ये शांत बसा . मास्क लावा, फोटो काढून शेअर करू नका. हा फॅशन वीक वा किंगफिशर कॅलेंडरचा काळ नाही...’
तुम्हाला ठाऊक आहेच की, सध्या बॉलिवूडचे अनेक स्टार्स मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. आलिया भट, रणबीर कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, टायगर श्रॉफ, दिशा पाटनी असे सगळेजण मालदीवमध्ये आहेत. अनेकजण मालदीवमध्ये सुट्टी घालवून परतले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shobhaa De slam celebs who celebrate vacation in maldives during pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.