रिया चक्रवर्तीला सपोर्ट करून ट्रोल झाली शिबानी दांडेकर, यूजर म्हणाला - लाज वाटायला पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 04:45 PM2020-09-03T16:45:49+5:302020-09-03T16:46:15+5:30

शिबानी दांडेकरच्या पोस्टवर कमेंट करून लोक संपात व्यक्त करत आहेत. तिला ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले की, 'तुला लाज वाटायला पाहिजे शिबानी दांडेकर.

Shibani Dandekar getting trolled for her social post to support Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीला सपोर्ट करून ट्रोल झाली शिबानी दांडेकर, यूजर म्हणाला - लाज वाटायला पाहिजे!

रिया चक्रवर्तीला सपोर्ट करून ट्रोल झाली शिबानी दांडेकर, यूजर म्हणाला - लाज वाटायला पाहिजे!

googlenewsNext

अभिनेत्री शिबानी दांडेकरने रिया आणि तिच्या परिवाराला सपोर्ट करणारी एक पोस्ट लिहिली होती. ज्यात ती म्हणाली होती की, ती रियाला १६ वर्षांची असतानापासून ओळखते. तसेच शिबानीने मीडियावरही आगपाखड केली होती. पण सोशल मीडिया यूजर्सना शिबानीची ही रियाला सपोर्ट करण्याची बाब अजिबात पसंत पडलेली दिसत नाही. 

शिबानी दांडेकरच्या पोस्टवर कमेंट करून लोक संपात व्यक्त करत आहेत. तिला ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले की, 'तुला लाज वाटायला पाहिजे शिबानी दांडेकर. तर कुणी लिहिले की, माझी प्राथर्ना आहे की, पुन्हा तुझा जन्म झाला तर जरा बुद्धीही मिळावी.

एकाने लिहिले की शिबानी तुला वाटत असेल की, तू तुझा फेक पीआर करून घेशील. पण तुला हे माहीत असलं पाहिजे की, हे २०२० आहे. आम्ही चुकीच्या माहितीच्या काळात जगत नाही. जिथे बॉलिवूडचे लोक आम्हाला मूर्ख बनवतील. आज आम्ही प्रेरणेसाठी वैज्ञानिक आणि इनोव्हेटर्सचा शोध घेत आहोत. तुमच्यासारख्या ड्रक माफियांचा नाही.

काय लिहिले होते शिबानी पोस्टमध्ये

शिबानीने लिहिले की, 'मी रिया चक्रवर्तीला तेव्हापासून ओळखते जेव्हा ती १६ वर्षांची होती. वायब्रेंट, मजबूत, जिंदादिल आणि ब्राइट स्पार्कसारखी...गेल्या काही महिन्यांपासून मी तिच्या आणि तिच्या पर्सनॅलिटीची उलट साइड बघत आहे. त्यांनी असा त्रास भोगलाय ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. आम्ही पाहिलंय मीडिया कशाप्रकारे गिधाडांप्रमाणे व्यवहार करत आहे. जसे एखाद्या शैतानाच्या शिकारीवर आहेत. एका निर्दोष कुटूंबावर आरोप लावत आहेत आणि खचून जाण्यापर्यंत त्यांना टॉर्चर करत आहेत'.

तिची चूक होती, एका मुलावर प्रेम करणं....

शिबानीने पुढे लिहिले की, 'तिच्याकडून आधारभूत मानवाधिकारही हिसकावून घेतले. कारण मीडिया तर जज, ज्यूरी आणि जल्लादाच्या भूमिकेत आहे. आपण पत्रकारितेचा मृत्यू आणि मानवतेचं भयावह रूप पाहिलंय. तिची चूक काय होती? तिने एका मुलावर प्रेम केलं. त्याच्या वाईट दिवसात त्याला साथ दिली, त्याच्यासोबत राहण्यासाठी आपलं जगणं बदललं. आणि जेव्हा त्याने फाशी लावून घेतली तेव्हा आपण काय झालो? मी स्वत: पाहिलंय की, या सर्व गोष्टींमुळे तिच्या आईची तब्येत कशी बिघडली. २० वर्षे देशाची सेवा करणाऱ्या तिच्या वडिलांवर याचा काय परिणाम झाला आहे. किती लवकर तिच्या भावाला मोठं व्हावं लागलं आणि किती मजबूत व्हावं लागलं'.

मी नेहमी तुझ्यासोबत आहे....

'माझी रिया तू ताकतवर आहे. तू जशी माणूस आहे आणि जसं तुला माहीत आहे की, सत्य तुझ्या बाजूने आहे. तू लढत आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम आणि आदर आहे. मला फार दु:खं होतंय की, तुला या सगळ्यातून जावं लागतंय. मला दु:खं आहे की, आम्ही चांगले नव्हतो. मला दु:खं आहे की, खूप लोकांनी तुला निराश केलं. तुझ्यावर संशय घेतला. जेव्हा तुला जास्त गरज होती, तुझ्यासोबत नव्हते. मला दु:खं आहे की, तू जीवनात जे सर्वात चांगलं काम केलं(सुशांतचा सांभाळ), त्याने तुला जीवनातील सर्वात वाईट अनुभव दिला. मी नेहमी तुझ्यासोबत आहे'.

'सुशांतला ठिक करणं बनलं होतं रियाचं मिशन, तिने प्रेमात सगळं केलं' - शिबानी दांडेकर

शिबानी दांडेकरने मौन सोडलं, म्हणाली - रियाला मी १६ वर्षांची असतानापासून ओळखते....

Web Title: Shibani Dandekar getting trolled for her social post to support Rhea Chakraborty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.